मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

भारतातही देणार Corona vaccine चा Booster dose; Omicron संकटात मोदी सरकारचा मोठा निर्णय

भारतातही देणार Corona vaccine चा Booster dose; Omicron संकटात मोदी सरकारचा मोठा निर्णय

कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आल्यानंतर अनेक देशांनी कोरोना लशीचा बुस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे.

कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आल्यानंतर अनेक देशांनी कोरोना लशीचा बुस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे.

कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आल्यानंतर अनेक देशांनी कोरोना लशीचा बुस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : भारतात कोरोनाची (Corona) दुसरी लाट (Second Wave) नियंत्रणात आलेली आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. परंतु, युरोपातल्या विविध देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. युरोपातल्या अनेक देशांमध्ये (Lockdown) कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोनाचा ओमिक्रॉन (Omicron) हा नवा व्हेरिएंट (Variant) आढळून आला आहे. यामुळे जगात एकच खळबळ उडाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) या व्हॅरिएंटचा समावेश `व्हे६रिएंट ऑफ कन्सर्न`मध्ये केला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातले देश सतर्क झाले आहेत. कोरोनाचा ओमिक्रॉन व्हॅरिएंट भारतात (India) पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे देशातल्या गंभीर आजार असलेल्या आणि इम्युनिटी कमकुवत असलेल्या गटाला लशीचा अतिरिक्त म्हणजेच बूस्टर डोस (Corona Booster Dose) देण्यासाठी एक नवं धोरण लागू केलं जाणार आहे. सध्या या धोरणाचा आराखडा तयार केला जात आहे. याबाबतचं वृत्त `दैनिक भास्कर`ने दिलं आहे.

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हॅरिएंट आढळून आल्यानं जगभरातले देश सतर्क झाले आहेत. या व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी तातडीनं पावलं उचलली जात आहेत. भारतानेदेखील या व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. सरकार गंभीर आजार असलेल्या (Severe Disease) आणि कमकुवत इम्युनिटी (Low Immunity) असलेल्या गटाला लशीचा बुस्टर डोस देण्याबाबत नवं धोरण आणणार आहे. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAG) दोन आठवड्यांत हे धोरण तयार करणार आहे. तसंच एनटीएजी देशातल्या 44 कोटी बालकांच्या लसीकरणासाठी नवं धोरणदेखील आणणार आहे, अशी माहिती देशाच्या कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली.

हे वाचा -जबरदस्त! आफ्रिकन देशांचा 'रक्षक' बनला भारत देश, अशी करणार मदत

एनडीटीव्हीशी बोलताना डॉ. एन. के. अरोरा म्हणाले, की `कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटवर सध्या उपलब्ध असलेल्या लशी (Vaccine) किती परिणामकारक ठरू शकतात, याबाबतची तपासणी देशातल्या अनेक प्रयोगशाळांमध्ये सुरू आहे. याबाबतची ठोस माहिती स्पष्ट होण्यासाठी किमान 2 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यानंतरच कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड किंवा अन्य कोणतीही लस या व्हॅरिएंटविरोधात किती सक्षम आहे, हे समजू शकेल.`

देशात अद्याप तरी कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण सापडलेला नाही. या महिन्याच्या सुरुवातीला बंगळुरूत आलेले 2 दक्षिण आफ्रिकी नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यापैकी एका रुग्णात डेल्टा (Delta) स्ट्रेन आढळला होता. याबाबत कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकरन यांनी सांगितलं, की `तपासणी नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. ओमिक्रॉन व्हॅरिएंटबाबत आम्ही सतर्क आहोत.`

हे वाचा - जगभरात झपाट्यानं पसरतोय Omicron variant, जाणून घ्या आतापर्यंत किती आढळले रुग्ण

`कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आल्यानंतर अनेक देशांनी ज्येष्ठ नागरिकांना लशीचा बूस्टर डोस देण्यास सुरवात केली आहे. यात अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायलचा समावेश आहे. बूस्टर डोसचा अर्थ असा, की आपल्याला आणखी 94 कोटी डोसची गरज भासणार आहे. हे डोस एका रात्रीत तयार करणं शक्य नाही. परंतु, देशात लशींची कमतरता नाही.`

`देशातल्या 12 ते 15 कोटी नागरिकांनी लशीचा पहिला डोसदेखील अद्याप घेतलेला नाही. सुमारे 30 कोटी नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. त्यामुळे आपल्याला लसीकरणाची गती वाढवावी लागेल, हे स्पष्ट आहे. लसीकरण हे प्राधान्यानं पूर्ण करणं गरजेचं आहे,` असं डॉ. अरोरा यांनी स्पष्ट केलं.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, Sanjeevani