मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Omicron | ओमिक्रॉनबद्दलचे 'ते' 4 प्रश्न ज्याची उत्तरं शोधण्यासाठी शास्त्रज्ञ दिवसरात्र झटतायेत!

Omicron | ओमिक्रॉनबद्दलचे 'ते' 4 प्रश्न ज्याची उत्तरं शोधण्यासाठी शास्त्रज्ञ दिवसरात्र झटतायेत!

कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) भीतीतून संपूर्ण जग अजून सावरले नाही तोच त्याच्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटने दहशत निर्माण केली आहे. सध्या जगातील अनेक देशांनी परदेशी प्रवासावर बंदी घातली आहे किंवा प्रवासाचे नियम खूप कडक केले आहेत. या नवीन प्रकाराबात काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे शास्त्रज्ञ शोधत आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 1 डिसेंबर : आता कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) ओमिक्रॉन व्हेरिएंटची (Omicron Variant) दहशत जगभर पसरत आहे. जगातील (World) बर्‍याच लोकसंख्येचे लसीकरण अद्याप बाकी आहे. आतापर्यंत या व्हेरिएंटचा प्रभाव आणि त्यावरील लसींची परिणामकारकता याबद्दल माहिती मिळालेली नाही. अशातच हा विषाणू वेगाने पसरत असल्याने जगातील सर्व देशांना सावधगिरीची पावलं उचलण्यास भाग पाडलं आहे. सध्या जगभरातील शास्त्रज्ञ ओमिक्रोमबाबत चार प्रमुख प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

चिंतेचे कारण?

अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनीही सांगितले की हा प्रकार नक्कीच चिंतेचे कारण आहे. मात्र, घाबरण्याचं कारण नाही. याचा प्राथमिक पुरावा त्याच्या वेगाने पसरण्याच्या क्षमतेबद्दल सांगतो. ओमिक्रॉन विषयी सविस्तर माहिती मिळण्यास जवळपास दोन आठवडे लागतील अशी माहिती अमेरिकेतील प्रमुख संसर्गजन्य रोग चिकित्सक डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे डॉ. अँथनी फौसी (Anthony Fauci) यांनी बिडेन यांना दिलीय. अशा परिस्थितीत सध्या प्रत्येक देशात प्रतिबंध आणि लस यावर अधिक भर दिला जात आहे.

सर्वात मोठा प्रश्न

यावेळी शास्त्रज्ञ ओमिक्रॉन प्रकाराबद्दल चार प्रमुख गोष्टी जाणून घेण्यात गुंतले आहेत. पहिला प्रश्न हा आहे की ओमिक्रॉन संसर्ग त्यांच्या देशात आला आहे की नाही. भारतात आतापर्यंत अशा कोणत्याही प्रकरणाची पुष्टी झालेली नाही आणि ज्या देशांत असे संक्रमण आढळले आहे त्या देशांच्या यादीत अमेरिकेचेही नाव नाही. एकीकडे, ओमिक्रॉन संसर्ग असलेल्या देशांची संख्या हळूहळू वाढत आहे, तर इतर देश देखील निर्बंध गांभीर्याने घेत असून तपासणी सुरू करण्यात आली आहे.

जगभर पसरतोय

अमेरिकेबद्दल बोलायचे तर सीडीसीला आतापर्यंत इथं असं कोणतेही प्रकरण आढळलं नाही. पण कोरोना विषाणूचे नमुने तयार करण्यात अमेरिका अनेक देशांच्या तुलनेत खूप मागे आहे. बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, अनेक तज्ञांचे मत आहे की हा व्हेरिएंट अमेरिकेत आला असण्याची शक्यता जास्त आहे. हा विषाणू आधीच यूके, ऑस्ट्रेलिया, इस्रायल आणि हाँगकाँगमध्ये पोहोचला आहे.

Explainer : Omicron डेल्टापेक्षा खरंच घातक आहे का; लशींचा प्रभाव कितपत?

ओमिक्रॉन डेल्टापेक्षा वेगाने पसरतो का?

प्राथमिक माहितीनुसार हे सत्य असल्याचे दिसत आहे. याची अनेक कारणे आहेत. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने याला धोकादायक म्हटले आहे. शिवाय हा खूप वेगाने पसरत असल्याचे म्हटले आहे. खरंतर हा दावा आत्ताच करणं चुकीचे होईल. कारण अद्याप याची सविस्तर माहिती मिळाली नाही. सीडीसीच्या मते डेल्टामध्ये 11-15 म्यूटेशन आढळले होते. आतापर्यंत ओमिक्रॉनच्या स्पाइक प्रोटीनमध्येच 30 हून अधिक म्यूटेशन मिळाले आहेत. ज्याप्रकारे ओमिक्रॉन पसरत आहे, त्यावरुन हे खरं असल्याचेही तज्ञ म्हणत आहे.

ओमिक्रॉन जीवघेणा आहे का?

हे आत्ता सांगणे खूप घाईचे असेल. कारण, आतापर्यंतच्या माहितीनुसार Omicron मुळे सौम्य आजार होऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेत याचा संसर्ग तरुणांमध्ये जास्त दिसून येत आहे. आत्तापर्यंत असे मानले जात होते की कोविडचा संसर्ग तरुणांमध्ये कमी दिसून येतो किंवा त्यांना गंभीर आजार होत नाही. पण दक्षिण आफ्रिकेत केवळ एक चतुर्थांश तरुणांचे लसीकरण करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी अजून डेटा आवश्यक आहे.

Coronaचा उद्रेक, त्या वृद्धाश्रमात आणखी 17 Covid पॉझिटिव्ह, बाधितांची संख्या 79

ओमिक्रॉन लसीवर वरचढ होईल?

यावरही निश्चितपणे काही सांगता येत नाही. याची पुष्टी करण्यासाठी अधिक वेळ आणि संशोधन आवश्यक आहे. स्पाइक प्रोटीन व्यतिरिक्त ओमिक्रॉनमध्ये इतर म्यूटेशन देखील झाले आहेत. वैज्ञानिक म्यूटेशनच्या बाबतीत सर्वात वाईट म्यूटेशन म्हणूनही अभ्यास करत आहेत. लसीकरणाचा परिणाम कमी होईल, असा दावा करण्याची परिस्थिती सध्यातरी दिसत नाही. पण, हा प्रभाव किती कमी होईल हा येणारा काळच सांगेल.

ओमिक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी आहे Covishield लस? पूनावाला यांनी दिलं उत्तर

सध्या खबरदारी हाच उपाय आहे. या कारणास्तव, लसीकरण, आयसोलेशन, मास्क यासारख्या उपायांवर पुन्हा भर दिला जात आहे. शास्त्रज्ञांना अधिक डेटा आवश्यक आहे, ज्यासाठी वेळ लागणार आहे. या क्षणी सावधगिरी खूप उपयुक्त ठरू शकते. त्याचवेळी, शास्त्रज्ञ असा सल्लाही देत ​​आहेत की लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरीही स्वत: ला सुरक्षित न समजता नियमांचे पालन करा.

First published:
top videos

    Tags: Corona spread, Coronavirus, Uk corona variant