मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Omicron पसरतो पाचपट वेगानं, पण कुठलीही गंभीर लक्षणं नाहीत! आरोग्य मंत्रालयाचा दिलासा

Omicron पसरतो पाचपट वेगानं, पण कुठलीही गंभीर लक्षणं नाहीत! आरोग्य मंत्रालयाचा दिलासा

जगभरात दहशत निर्माण करणारा ओमिक्रॉन हा व्हेरिएंट आधीपेक्षा पाचपट वेगाने (No severe symptoms of Omicron reported so far says health ministry) पसरत असला तरी त्याची कुठलाही गंभीर लक्षणं दिसत नसल्याचं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 2 डिसेंबर: जगभरात दहशत निर्माण करणारा ओमिक्रॉन हा व्हेरिएंट आधीपेक्षा पाचपट वेगाने (No severe symptoms of Omicron reported so far says health ministry) पसरत असला तरी त्याची कुठलाही गंभीर लक्षणं दिसत नसल्याचं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी जारी (Health ministry issues notification) केलेल्या निवेदनातून ही माहिती दिली आहे. ओमिक्रॉन व्हायरस आतापर्यतचा सर्वात वेगाने पसरणारा व्हेरिएंट असला तरी मास्क वापरणं (Mask is the solution) हेच यावरचं रामबाण उत्तर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

जगभरातील निरीक्षणं

जगात आतापर्यंत ज्या ज्या देशांत ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आला आहे, तिथल्या रुग्णांना याची सामान्य लक्षणंच दिसल्याची नोंद करण्यात आली आहे. आधीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत कुठलीही गंभीर लक्षणं या व्हेरियंटची दिसलेली नाहीत. त्यामुळे ज्या नागरिकांचं कोरोना लसीकरण पूर्ण झालं आहे, त्यांना या नव्या व्हेरिएंटपासून असणारा धोका अत्यल्प असल्याचं सांगण्यात आलं आहे. नव्या व्हेरिएंटपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नियमितपणे घेतली जाणारी काळजी आणि निर्बंधांचं पालन हेच योग्य उपाय असल्याचं आरोग्य विभागनं म्हटलं आहे.

प्रभावित देशांसाठी निर्बंध

ज्या देशात आतापपर्यंत ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आला आहे, त्या देशातून भारतात येणाऱ्या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. ही चाचणी निगेटिव्ह आली तरीदेखील सात दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे. ज्या देशांमध्ये अद्याप ओमिक्रॉन आढळलेला नाही, त्या देशांसाठी मात्र ही अट लागू नसेल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे वाचा- 'One Night Stand' ने उद्धवस्त केलं तरुणीचं आयुष्य; आता होतोय पश्चाताप

कर्नाटकात आढळले दोन रुग्ण

देशातील पहिले दोन रुग्ण कर्नाटकात आढळून आल्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलं आहे. मात्र नव्या व्हेरिएंटमध्ये केवळ पसरण्याचा वेग वगळता इतर सर्व लक्षणं आधीप्रमाणेच असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता न करता काळजी घेणं गरजेचं असल्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य विभागानं दिला आहे.

First published:

Tags: Corona, Health, Who