मुंबई, 2 डिसेंबर : कोरोनाचा धोका कमी होतो न होतो तोच आता ओमायक्रॉनचं (Omicron in India) संकट देशापुढे उभं राहिलं आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेला (South Africa) कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron) आता भारतातही शिरकाव केला आहे. ओमायक्रॉन हा अधिक संसर्गजन्य असल्यानं अनेक देशांनी त्याचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. दरम्यान भारतात ओमायक्रॉनची लागण झाली असून असे दोन रुग्ण आढळून आले आहे. हे दोन्ही महाराष्ट्राजवळील कर्नाटक राज्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान या दोन्ही रुग्णांबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. यातील पहिला रुग्ण हा या आजारातून बरा होऊन परदेशातही परतल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र दुसऱ्या रुग्णामुळे चिंता वाढली आहे. या दुसऱ्या रुग्णाची हिस्ट्री तपासली असता त्याने कधीच परदेशात प्रवास केला नाही. तर ही व्यक्ती आरोग्य कर्मचारी आहे. त्याशिवाय या व्यक्तीमुळे आणखी पाच जणांना (3 primary contacts and 2 secondary contacts (total 5)) लागण झाली आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही ओमायक्रॉनचीच लागण झाली आहे की, नाही याचा तपास सुरू आहे. हे ही वाचा- Explainer: कसा लागला ओमिक्रॉनचा शोध? विषाणूचे नवीन प्रकार शोधण्याची पद्धत कोणती? विशेष म्हणजे ओमायक्रॉनची लागण झालेल्या दोन्ही रुग्णांनी कोरोनाच्या दोन्ही लशी (Both had taken 2 doses of vaccine) घेतलेल्या आहेत. मात्र दुसऱ्या व्यक्तील नेमकी कुठून लागण झाली याबाबत तपास केला जात आहे. अन्यथा ही रुग्णसाखळी अधिक वाढण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, हा आतापर्यंतचा सर्वांत वेगाने म्युटेट होणारा व्हॅरिएंट आहे. WHO ने व्हॅरिएंट ऑफ कन्सर्नच्या यादीमध्ये याचा समावेश केला आहे. कोरोना विषाणू त्याच्या स्पाइक प्रोटीनच्या (Omicron Spike Protein mutation) माध्यमातून मानवी पेशींमध्ये शिरण्यासाठी जागा बनवतो. सध्या उपलब्ध असणाऱ्या लशी स्पाइक प्रोटीनच्या विरोधातच अँटीबॉडी (Antibodies against spike protein) तयार करतात, जेणेकरून या स्पाइक प्रोटीनशी लढण्यास आपलं शरीर सक्षम होईल आणि विषाणू आपल्या शरीरामध्ये दाखल झाला, तरी नुकसान होणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







