मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer : कसा लागला ओमिक्रॉनचा शोध? विषाणूचे नवीन प्रकार शोधण्याची पद्धत कोणती?

Explainer : कसा लागला ओमिक्रॉनचा शोध? विषाणूचे नवीन प्रकार शोधण्याची पद्धत कोणती?

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची दहशत सध्या जगभर पसरली आहे. अद्याप या नव्या प्रकाराची संपूर्ण माहिती शास्त्रज्ञांना मिळालेली नाही. मात्र, कोणताही नवीन व्हेरिएंट शास्त्रज्ञ कसा शोधतात? यासाठी कोणती पद्धत वापरली जाते याविषयी आज आपण जाणून घेऊया.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची दहशत सध्या जगभर पसरली आहे. अद्याप या नव्या प्रकाराची संपूर्ण माहिती शास्त्रज्ञांना मिळालेली नाही. मात्र, कोणताही नवीन व्हेरिएंट शास्त्रज्ञ कसा शोधतात? यासाठी कोणती पद्धत वापरली जाते याविषयी आज आपण जाणून घेऊया.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची दहशत सध्या जगभर पसरली आहे. अद्याप या नव्या प्रकाराची संपूर्ण माहिती शास्त्रज्ञांना मिळालेली नाही. मात्र, कोणताही नवीन व्हेरिएंट शास्त्रज्ञ कसा शोधतात? यासाठी कोणती पद्धत वापरली जाते याविषयी आज आपण जाणून घेऊया.

पुढे वाचा ...

मुंबई, 2 डिसेंबर: सध्या जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची चर्चा सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेला ओमिक्रॉन हा व्हेरिएंट (Omicron Variant) आता सुमारे 15 देशांमध्ये पसरला आहे. जगभरातल्या यंत्रणा या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सतर्क झाल्या आहेत. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचं कारण ठरलेल्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही ओमिक्रॉन हा व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य (Omicron more transmissible than Delta) असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. आधी अल्फा, बीटा, गामा, डेल्टा आणि आता ओमिक्रॉन आणि त्याची होत असलेली म्युटेशन्स या सगळ्याची माहिती संशोधकांना कशी कळते? नव्या व्हेरिएंटचा शोध (Discovery of New variants) कसा लागतो? याबाबतची माहिती देत आहोत.

नोव्हेंबरच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेच्या गाउटेंग प्रांतातील कोरोनाविषयक लॅबमध्ये संशोधकांना एक वेगळंच प्रकरण दिसून आलं. डोकेदुखी आणि थकवा जाणवणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत होती; पण त्यांच्या शरीरात असलेल्या कोरोना विषाणूमध्ये स्पाइक प्रोटीन बनवणारा जीनच (Missing Gene led to Omicron discovery) बेपत्ता होता. या स्पाइक प्रोटीनच्या माध्यमातूनच कोरोना मानवी पेशींमध्ये प्रवेश करतो. या जीनच्या शोधासाठी 15 नोव्हेंबरच्या दरम्यान गाउटेंग प्रांतातून आलेल्या 77 सॅम्पल्सचं जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं. यानंतर हा कोरोनाचा एक नवाच व्हेरिएंट असल्याचं संशोधकांच्या लक्षात आलं. या व्हेरिएंटचा जीन म्युटेट झाल्यामुळे तो कोणत्याही चाचणीत दिसून येत नव्हता.

त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटला B.1.1.529 म्हणजेच ओमिक्रॉन असं नाव दिलं. त्यानंतर त्यात वेगाने होणारं म्युटेशन (Omicron mutation) आणि याचा वेगाने होत असलेला संसर्ग पाहून 26 नोव्हेंबरला WHO ने त्याला चिंताजनक व्हेरिएंट्सच्या (Omicron in WHO list of concern) यादीमध्ये समाविष्ट केलं. या यादीमध्ये अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्टा या चार व्हेरिएंट्सचा आधीच समावेश करण्यात आला आहे.

व्हेरिएंटचा शोध कसा लावतात?

एखाद्या विषाणूचा वेगळा व्हेरिएंट शोधण्यासाठी सर्वांत महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे जीनोम सीक्वेन्सिंग. जीनोम सीक्वेन्सिंगबाबत माहिती करून घेण्यापूर्वी जीन्स (Genes) आणि जीनोम (Genome) म्हणजे काय, हे माहिती असणं गरजेचं आहे. जगातला कोणत्याही सजीवाची जडणघडण कशी असेल, हे त्याच्या जीन्सवर ठरतं. जीनोम हा त्याचाच पुढचाच टप्पा. कोणत्याही सजीवाचा पूर्ण जेनेटिक कोड म्हणजेच जीनोम. उदाहरणार्थ, आपले आणि आपल्या आई-वडिलांचे थोडेफार जीन्स सारखे असले, तरी आपला आणि त्या दोघांचाही जीनोम सीक्वेन्स अगदी वेगवेगळा असतो.

Goat Milk : कोरोनापासून बचाव करू शकतं शेळीचं दूध? काय सांगतात तज्ज्ञ पाहा

या जीनोमची संरचना अतिशय गुंतागुंतीची असते. त्यामुळेच याचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक याला एका प्रकारच्या कोडमध्ये (Genome code) रूपांतरित करतात. हा कोड माहिती करून घेण्यासाठी जी प्रक्रिया पार पाडली जाते, त्यासाठी जीनोम मॅपिंग (Genome mapping) किंवा जीनोम सीक्वेन्सिंग (Genome sequencing) म्हणतात. एकंदरीत, ऑफिसमध्ये जसा तुमचा ठराविक आयडी क्रमांक असतो किंवा भारतीय नागरिकांकडे जसा युनिक आधार नंबर आहे, तसाच पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवाचा युनिक असा जीनोम कोड असतो. या कोडच्या माध्यमातून त्या ठराविक सजीवाबद्दल संपूर्ण माहिती मिळवता येते.

ओमिक्रॉनबद्दलचे 4 प्रश्न ज्याची उत्तरं शोधण्यासाठी शास्त्रज्ञ दिवसरात्र झटतायेत

याप्रमाणेच कोरोना विषाणूचे आणि त्याच्या सर्व व्हेरिएंट्सचे ठराविक जीनोम कोड ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे एखाद्या रुग्णामध्ये कोरोना विषाणूचा व्हेरिएंट आढळल्यानंतर, डेटाबेसमध्ये आधीपासून उपलब्ध असणाऱ्या जीनोम कोडशी त्याची तुलना केली जाते आणि त्यावरून रुग्णाच्या शरीरात कोरोनाचा कोणता व्हेरिएंट आहे, हे निश्चित केलं जातं. दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या काही रुग्णांच्या नमुन्यांबाबत हीच प्रक्रिया सुरू असताना त्यातला एक महत्त्वाचा जीन गायब असल्याचं शास्त्रज्ञांना लक्षात आलं. त्यामुळे या रुग्णांच्या शरीरात आढळलेला व्हेरिएंट डेटाबेसमध्ये असणाऱ्या कोणत्याच व्हेरिएंटशी मॅच होत नव्हता. यानंतर मोठ्या प्रमाणात संशोधन केल्यानंतर हा नवीन व्हॅरिएंट असल्याचं लक्षात आलं.

दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य विभागाचे कार्यकारी संचालक जनरल निकोलस क्रिस्प यांना 24 नोव्हेंबरला याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी इतर अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर आफ्रिकेतल्या दोन जीनोम सीक्वेन्सिंग संस्थांचे प्रमुख टुलिओ डि ऑलिवेरा यांनी नव्या व्हेरिएंटबद्दल अधिकृत घोषणा केली. यानंतर 26 नोव्हेंबरला WHOने याला चिंताजनक व्हेरिएंटच्या यादीमध्ये समाविष्ट केलं.

ओमिक्रॉन डेल्टाशी संबंधित नाही, पूर्णपणे नवीन व्हेरिएंट

ओमिक्रॉनबाबत संशोधक मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त करत आहेत. याला कारण म्हणजे ओमिक्रॉन हा कोरोनाच्या डेल्टा या व्हेरिएंटशी संबंधित (Omicron not related to Delta) नाही. या व्हेरिएंटचं प्रोफाइल कोरोनाच्या आधीच्या व्हेरिएंटच्या स्ट्रेन्सपेक्षा एकदम वेगळी आहे. विशेष म्हणजे या व्हेरिएंटच्या स्पाइक प्रोटीनमध्ये 30 हून अधिक वेळा म्युटेशन झालं असल्याचं संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. या व्हेरिएंटबाबत संशोधकांना अद्याप पुरेशी माहिती उपलब्ध नसली, तरी हा डेल्टाच्या तुलनेत 6 पटीने अधिक संसर्गजन्य असल्याचं कित्येक संशोधकांचं म्हणणं आहे.

OMICRON चा धोका! 15 तारखेपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय रद्द

भारतातलं जीनोम सीक्वेन्सिंग

भारतातल्या कोरोना विषाणूच्या व्हेरिएंट्सबाबत माहिती गोळा करण्यासाठी 25 डिसेंबर 2020 रोजी जीनोम सीक्वेन्सिंग फोरम तयार करण्यात आलं होतं. इंडियन सार्स सीओव्ही-2 कन्सॉर्शियम ऑन जीनॉमिक्स (INSACOG) असं या फोरमचं नाव आहे. याअंतर्गत देशातल्या दहा प्रयोगशाळांमध्ये जीनोम सीक्वेन्सिंग करण्यात येतं. देशातल्या जीनोम सीक्वेन्सिंगची गती दुसऱ्या लाटेनंतर वाढली होती; पण दुसरी लाट ओसरल्यानंतर जीनोम सीक्वेन्सिंगचं प्रमाणही कमी झाल्याचं दिसून आलं आहे. या वर्षात जूनमध्ये सर्वाधिक 12,257 सॅम्पल्सचं जीनोम सीक्वेन्सिंग करण्यात आलं होतं. ऑगस्टमध्ये 6,458 सॅम्पल्सचं जीनोम सीक्वेन्सिंग करण्यात आलं होतं.

First published:

Tags: Corona, Corona spread, Uk corona variant