मराठी बातम्या /बातम्या /देश /

Omicron विरुद्ध लढण्यासाठी Covaxin लस अधिक प्रभावी असू शकते: ICMR

Omicron विरुद्ध लढण्यासाठी Covaxin लस अधिक प्रभावी असू शकते: ICMR

दक्षिण आफ्रिकेत Omicron व्हेरिएंट आढळून आल्यावर जगभरात एकच खळबळ माजली. सध्या कोरोनावर (Corona Virus) जी लस वापरली जात आहे ती ओमिक्रॉनलाही प्रतिरोधक आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दक्षिण आफ्रिकेत Omicron व्हेरिएंट आढळून आल्यावर जगभरात एकच खळबळ माजली. सध्या कोरोनावर (Corona Virus) जी लस वापरली जात आहे ती ओमिक्रॉनलाही प्रतिरोधक आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दक्षिण आफ्रिकेत Omicron व्हेरिएंट आढळून आल्यावर जगभरात एकच खळबळ माजली. सध्या कोरोनावर (Corona Virus) जी लस वापरली जात आहे ती ओमिक्रॉनलाही प्रतिरोधक आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 03 डिसेंबर: कोरोना व्हायरसच्या (Covid-19) नवीन व्हेरिएंट 'ओमिक्रॉन'नं (Omicron Variant ) जगभरातील लोकांची चिंता वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकेत हा व्हेरिएंट आढळून आल्यावर जगभरात एकच खळबळ माजली. अशा परिस्थितीत सध्या कोरोनावर (Corona Virus) जी लस वापरली जात आहे ती ओमिक्रॉनलाही प्रतिरोधक आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच भारत बायोटेकची (Bharat Biotech) कोविड लस (Covid vaccine ) कोव्हॅक्सिन (Covaxin) ओमिक्रॉन व्हेरिएंटविरुद्ध अधिक प्रभावी ठरू शकते, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

हिंदू बिझनेस लाइननं आपल्या वृत्तात निनावी अधिकाऱ्याचं न देता म्हटलं आहे की, इतर उपलब्ध लसींच्या तुलनेत ओमिक्रॉनच्या विरूद्ध कोव्हॅक्सिन अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. कोवॅक्सिन, एक virion-निष्क्रिय लस संपूर्ण व्हायरस कव्हर करते आणि या अत्यंत उत्परिवर्तित नवीन व्हेरिएंटविरूद्ध कार्य करू शकते, असं अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे.

 हेही वाचा-  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग सेवेतून निलंबित

आणखी एका निनावी ICMR अधिकाऱ्यानं रिपोर्टमध्ये म्हटलं की, कोव्हॅक्सिन हे अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा सारख्या इतर प्रकारांविरूद्ध देखील प्रभावी असल्याचं आढळून आले आहे. त्यामुळे आम्ही आशा करू शकतो की ते नवीन व्हेरिएंटविरूद्ध देखील प्रभावी ठरेल. दरम्यान अधिक नमुने प्राप्त होईपर्यंत आणि चाचणी होईपर्यंत अधिकाऱ्याने आत्मसंतुष्टतेविरूद्ध इशारा दिला आहे.

पुढे अधिकारी सांगतात की, आम्ही अपेक्षा करतो की ती लस संरक्षण प्रदान करेल. एकदा आम्हाला नमुने मिळाल्यावर, आम्ही पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) येथे या लसीच्या परिणामकारकतेची चाचणी करू.

हेही वाचा- खेळ पडला भलताच महागात; मित्राने ब्लेडने कापला मुलाचा प्रायव्हेट पार्ट अन्...

वुहानमध्ये सापडलेल्या मूळ प्रकाराविरूद्ध ही लस विकसित केली गेली आहे आणि ती इतर व्हेरिएंटविरूद्ध कार्य करू शकते हे दाखवून दिले आहे. पुढील संशोधन सुरु असल्याचं एका स्त्रोताचा हवाला देऊन कंपनीच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

ओमिक्रॉन अधिक धोकादायक

दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितलं की, ओमिक्रॉनमध्ये मागील व्हेरिएंटपेक्षा जास्त उत्परिवर्तन दिसून येत आहे. दक्षिण आफ्रिकेतील साथीचे रोग विशेषज्ञ सलीम अब्दुल करीम यांनी सीबीएस न्यूजला सांगितलं की, नवीन व्हेरिएंटवरील विद्यमान लसी काम करत नाहीत ही चिंतेची बाब आहे. याशिवाय त्याचा प्रसारही झपाट्याने होत आहे. जर हा प्रकार डेल्टा पेक्षा जास्त किंवा अधिक वेगानं पसरला तर, अंदाज करणं फार कठीण जाईल, असं करीम म्हणाले.

नवीन व्हेरिएंटबद्दल चिंता

कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटला आधी B.1.1.529 असं नाव देण्यात आलं होतं, मात्र आता WHO ने म्हटलं आहे की, ते Omicron म्हणून ओळखले जाईल. तसंच, 'व्हेरिएंट ऑफ कन्सर्न' या श्रेणीमध्ये ठेवण्यात आलं आहे. याचा अर्थ कोरोना व्हायरसच्या या नवीन व्हेरिएंटबाबत चिंता व्यक्त करण्यात आली असून येत्या काही दिवसांत त्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. WHO ने एका निवेदनात म्हटलं आहे की, ही चिंतेची बाब आहे की कोरोनाच्या या व्हेरिएंटमध्येही वेगानं उत्परिवर्तन होत आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Coronavirus cases