जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / VIDEO : असाही लढा! कोरोनाशी लढणाऱ्या नर्स आणि तिच्या मुलीचे अश्रू पाहून डोळ्यात येईल पाणी

VIDEO : असाही लढा! कोरोनाशी लढणाऱ्या नर्स आणि तिच्या मुलीचे अश्रू पाहून डोळ्यात येईल पाणी

VIDEO : असाही लढा! कोरोनाशी लढणाऱ्या नर्स आणि तिच्या मुलीचे अश्रू पाहून डोळ्यात येईल पाणी

कोरोनारुग्णांवर उपचारासाठी आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करणाऱ्या परिचारिकांच्या घरात काय परिस्थिती असते ते सांगणारा आणि त्या किती अविरत लढत आहेत याची जाणीव करून देणारा हा VIDEO पाहाच.

  • -MIN READ
  • Last Updated :

बेळगाव, 8 एप्रिल : Coronavirus शी लढा देण्यासाठी आपल्याला 15 दिवस घरी राहायला सांगितलं, तर तेही जमत नाही. पण कोरोनाव्हायरसच्या साथीत अविरत काम करणाऱ्या, रुग्णांसाठी अखंड सेवा करणाऱ्या आरोग्य सेवकांचं काय होत असेल? ते किती आणि कोणकोणत्या पातळीवर लढत असतील? डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवर यांचं कौतुक आपण कधी थाळ्या वाजवून केलं, तर कधी एखादी पोस्ट फॉरवर्ड करून. पण प्रत्यक्षात किती मोठं काम ही मंडळी करत आहेत आणि त्यासाठी त्यांच्या घरच्यांनाही किती मोठा त्याग करावा लागतो आहे, याची जाणीव करून देणारा एक VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करणाऱ्या नर्सची अवस्था काय असेल हे सांगणारा हा व्हिडीओ आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिला आहे. 15 दिवसांनी आई दिसली, तेही दुरून… तीन वर्षाच्या चिमुरडीला आईच्या नावाने हाक मारताना आणि रडताना पाहून अनेकांच्या हृदयात कालवाकालव होईल.  वाचा - ‘लॉकडाऊन वाढवावाच लागेल’, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संकेत सुनंदा कोरेपूर या बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या सरकारी रुग्णालयात गेली चार वर्षं नर्स म्हणून काम करत आहेत. कोरोनाचा कहर सुरू झाला तेव्हा त्यांची नेमणूक आयसोलेशन वॉर्डमध्ये करण्यात आली. सुनंदा यांना तीन वर्षाची मुलगी आहे. दिवसभर कोरोनाग्रस्त रुग्णांबरोबर असल्यामुळे संसर्गाचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने त्यांना ड्युटी संपल्यावर घरी जाण्याऐवजी हॉटेलमध्येच राहण्याचा पर्याय दिला. त्यामुळे सुनंदा गेले काही दिवस काम संपल्यावर हॉटेलमध्येच विश्रांतीसाठी जात आहेत. हे वाचा - महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या इतकी कशी वाढली? उद्धव ठाकरे म्हणतात… आई इतक्या दिवसात घरी का आली नाही म्हणून ऐश्वर्याला समजावताना सुनंदा यांचे पती श्रीकांत यांच्या नाकी नऊ येतात. शेवटी मंगळवारी तब्बल पंधरा दिवसांनी आईला बघण्यासाठी म्हणून श्रीकांत आपली मुलगी ऐश्वर्याला घेऊन परिचारिकांचं वास्तव्य असलेल्या हॉटेलपाशी आले. मुलगी आलेली बघून आई हॉटेलबाहेर आली, पण मुलीच्या आणि पतीच्या जवळ न जाता सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत त्यांचा दुरूनच संवाद सुरू होता. माय-लेकीचा हा अश्रुंचा संवाद दाखवणारा VIDEO सगळीकडे फिरतो आहे.

जाहिरात

हा VIDEO कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीदेखील पाहिला. त्यांनी बुधवारी तातडीने नर्स सुनंदा यांना फोन करून त्यांच्या अविश्रांत कामाबद्दल त्यांना धन्यवाद दिले. आईसाठी रडणाऱ्या मुलीकडे पाहून मलाही खूप वाईट वाटलं. खाऊसुद्धा नाकारणारी आणि आई पाहिजे म्हणणारी ही चिमुरडी पाहून मुख्यमंत्र्यांचं मनसुद्धा हेलावलं. ‘एकवेळ अन्न नको पण मास्क द्या’, कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टरांची आर्त हाक सुनंदा यांच्यासाठी, त्यांच्या घरच्यांसाठी आणि तशाच कोरोनाच्या साथीत लढणाऱ्या इतर परिचारिकांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. (संपादन - अरुंधती) अन्य बातम्या घराबाहेर पडताना मास्क अत्यावश्यक, नाहीतर अटक होणार मुंबईतील मोठे हॉटस्पॉट, ‘या’ 11 रुग्णांपासून 113 लोकांना झाला कोरोनाचा संसर्ग

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात