'एकवेळ अन्न नको पण मास्क द्या', कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टरांची आर्त हाक

'एकवेळ अन्न नको पण मास्क द्या', कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टरांची आर्त हाक

आपल्या जीवाची पर्व न करता, लोकांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचा जीव धोक्यात.

  • Share this:

सिडनी, 08 एप्रिल : कोरोनामुळे साऱ्या जगाची अवस्था दयनीय झाली आहे. एकीकडे डॉक्टर दिवसरात्र मेहनत करून रुग्णांवर उपचार करत आहेत. असे असले तरी मृतांचा आकडा हा वाढताच आहे. जगभरात जवळजवळ 70 हजार लोकांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. यात डॉक्टर आणि नर्स यांचाही समावेश आहे. कारण डॉक्टरांनी त्यांना गरजेच्या वस्तू मिळेनाशा झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील डॉक्टरांची देखील अशीच अवस्था झाली आहे.

ऑस्ट्रेलियात 5 हजारहून अधिक लोकांना कोरोना झाला आहे. यात डॉक्टरांचाही समावेश आहे. त्यामुळे येथील डॉक्टरांनी एन-95 मास्क डॉक्टरांना उपलब्ध नसल्याची तक्रार केली आहे. येथील डॉक्टरांनी लोकं आभार व्यक्त करणारे पत्र पाठवतात, काहींनी तर खाण्याचे पदार्थही आणून दिले, असे सांगितले. मात्र या डॉक्टरांची अपेक्षा मापक आहे, त्यांना फक्त मास्क हवे आहेत. सिडनी येथील शासकिय रुग्णालयातील डॉक्टरांनी सरकार आणि जनतेला आवाहन केले आहे की, 'आम्हाला जेवण नको पण मास्क द्या'. कोरोना टाळण्यासाठी हात धुणे मास्कचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे मास्कची मागणी वाढली आहे. सद्यपरिस्थितीत डॉक्टरांकडेच मास्क नाही आहे. परिणामी त्यांचा जीव धोक्यात आला आहे.

वाचा-VIDEO : डॉक्टर महिलेसोबत गंभीर प्रकार, कोरोनाच्यामुळे शेजाऱ्यांनी केली शिवीगाळ

येथील डॉक्टरांनी, "जर तुम्ही रुग्णालयात गेलात तर तुम्हाला दिसेल की रुग्णांच्या तोंडाला मास्क आहे. पण डॉक्टरांच्या नाही. एन-95 मास्क नसल्यामुळे आम्हाला उपचार करता येत नाहीत", असे सांगितले. डॉक्टराची परिस्थिती एवढी वाईट आहे की काही लोकांना स्वत:च्या घरून मास्क आणावे लागत आहेत तर, काही स्कुबा गिअरचा मास्क म्हणून वापर करत आहेत.

वाचा-पोलीस मदत करत नाहीत असं वाटत असेल तर चुकीचं, गर्भवती महिलेनं शेअर केला अनुभव

डॉक्टरांच्या या मागणीनंतर ऑस्ट्रेलियन वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या संबंधित एका याचिकेवर त्यांनी 1 लाख 55 हजारहून अधिकांनी स्वाक्षर्‍या केल्या. तर, ऑस्ट्रेलियाचे आरोग्यमंत्री ग्रेग हंट यांनी सरकार तातडीने आरोग्य सेवा कामगारांसाठी 10 लाख मास्क आयात करणार असल्याचे सांगितले. यासाठी ऑस्ट्रेलियातील स्थानिक कंपनींना 60 हजार मास्क तयार करण्यास सांगितले आहे.

वाचा-6 वर्षांच्या मुलानं मृत्यूला हरवलं, फुफ्फुसाच्या आजारानंतर आता कोरोनावर मात

कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आपल्याला फक्त आणि फक्त वैद्यकिय कर्मचारीच वाचवू शकतात. त्यामुळं लोकांनी डॉक्टारांना सहकार्य करावे, असे आवाहन आम्ही न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2020 01:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading