मुंबईतील मोठे हॉटस्पॉट, 'या' 11 रुग्णांपासून 113 लोकांना झाला कोरोनाचा संसर्ग

मुंबईतील जी-साऊथ वॉर्डपर्यंत 113 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हा संसर्ग कसा पसरत गेला वाचा सविस्तर

मुंबईतील जी-साऊथ वॉर्डपर्यंत 113 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हा संसर्ग कसा पसरत गेला वाचा सविस्तर

  • Share this:
    मुंबई, 08 एप्रिल : मुंबईत कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यापैकी जवळपास 500 हून अधिक रुग्ण मुंबईतील आहेत. मुंबईतील जी-साऊथ वॉर्डपर्यंत 113 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये सुरुवातील 11 रुण असे आहेत ज्यांच्यामुळे हा कोरोना त्यांच्या कुटुंबीयांमध्ये, नातेवाईकांमध्ये शेजारी पसरला आणि त्यांच्यामुळे इतर लोकांपर्यंत संसर्ग वेगानं वाढत गेला आहे. आज आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारवीसह मुंबईत एकूण 44 नवीन लोकांचे कोरोनाचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार 11 कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमुळे कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे हा व्हायरस पसरला आहे. 11 इंडेक्स केसेस समोर आल्या आहेत. त्या कोणत्या भागातील आहेत आणि त्यांच्यामुळे कसा कोरोना व्हायरस पसरला वाचा सविस्तर. केस-1: वरळी बीडीडी चाळीतील पोलीस कर्मचाऱ्याचा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. पोलीस कर्मचाऱ्यापासून आणखी दोन लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. केस-2: प्रभादेवी इथे राहणाऱ्या 65 वर्षीय महिलेला जेवण देण्याचं काम करत होती. त्याच दरम्यान तिला कोरोनाची लागण झाली आणि तिचा 26 मार्चला मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या महिलेमुळे कुटुंबीय, शेजारचे लोक असे मिळून 12 जणांना याचा संसर्ग झाला आहे. या सगळ्यांवर सध्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे वाचा-किरीट सोमय्यांना पोलिसांनी केली अटक, स्वत:च ट्विटरवरून दिली माहिती केस- 03 : ट्रॉम्बे सेक्टरमध्ये शेफचं काम करणाऱ्या एका व्यक्तीचा रिपोर्ट मार्च शेवटच्या आठवड्यात पॉझिटिव्ह आला होता. त्याला कोरोनाची लागण कशी झाली यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकली नाही मात्र त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा तपास सुरू आहे. सध्या 7 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केस- 5 : दक्षिण मुंबईतील एका डॉक्टरच्या क्लिनीकमध्ये टेक्निशियनचं काम करणाऱ्या वरळी कोळीवाडा इथल्या तरुणाला कोरोनाची लागण झाली. त्याच्यामुळे आणखीन तीन लोकांना संक्रमण झालं आहे. केस- 6 : मार्चच्या पहिल्या आठवड्यात ओमानहून एक व्यक्ती परतला होता. हा व्यक्ती वरळी कोळीवाडा इथला रहिवासी आहे. दोनवेळा टेस्ट करून निगेटीव्ह आल्यानंतर पुन्हा मार्चच्या शेवटच्या महिन्यात तिसऱ्यांदा चाचणी करण्यात आली तेव्हा रिझल्ट पॉझिटिव्ह आला. हा व्यक्ती ज्यांना भेटला त्यांचा शोध सुरू आहे. त्याच्यामुळे अनेक नागरिक संक्रमित झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे वाचा-प्राण्यांमध्येही पसरत आहे Coronavirus, पेट्सच्या देखभालीसाठी WHOच्या सूचना केस- 7 : जीजामात नगरइथली एका चाळीतील महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तिच्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील 10 जणांना संसर्ग झाला आहे. सर्वात जास्त कोरोनाचं संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या या परिसरात जास्त आहे. केस- 8 : लोअर परळ परिसरात स्पेनहून परतलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली होती. या महिलेनं स्वत:ला होम क्वारंटाइन केल्यानं तिच्यामुळे अद्याप कुणाला संसर्ग झाला नाही अशी माहिती मिळत आहे. केस- 9 : जीजामाता परिसरात सफाई कर्मचाऱ्याला 4 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली होती. त्याच्यापासून कुटुंबीय आणि आजूबाजूच्या परिसरातील 4 जणांना कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. केस- 10 : मुंबईतील एका रुग्णालयात आचारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. धारवीत एकूण 6 रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या व्यक्तीमुळे जीजामात नगर परिसरातील 2 जणांना संक्रमण झाल्याचा दावा केला जात आहे. केस- 11 :एका खासगी रुग्णालयात जाऊन आल्यानंतर आदर्शनगर इथे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. त्याच्यापासून कुटुंबातील एका व्यक्तीला संसर्ग झाला आहे. या व्यतिरिक्त तो ज्या व्यक्तींना भेटला त्यांचा शोध सुरू आहे. त्यांनाही कोरोनाचा धोका असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे वाचा-प्राण्यांमध्येही पसरत आहे Coronavirus, पेट्सच्या देखभालीसाठी WHOच्या सूचना संपादन- क्रांती कानेटकर.
    First published: