जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'लॉकडाऊन वाढवावाच लागेल', सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संकेत

'लॉकडाऊन वाढवावाच लागेल', सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संकेत

'लॉकडाऊन वाढवावाच लागेल', सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संकेत

देशात कोविड – 19 रुग्णांची संख्या 5,194 वर पोहोचली आहे. ही संख्या झपाट्याने वाढत आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 8 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वपूर्ण संकेत दिले. कोरोनाव्हायरसच्या (Covid -19) प्रकरणात वाढ होत असताना सर्व भागांतून  14 एप्रिल रोजी लॉकडाऊन उठवणे शक्य होणार नाही. सर्व पक्षांच्या नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी  म्हणाले की, ते राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करतील पण लॉकडाऊन लवकरच संपेल अशी शक्यता दिसत नाही. सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन वाढवावाच लागेल. कोविड - 19 नंतर पुन्हा आयुष्य पूर्वीसारखे नसेल, असं  पंतप्रधान यावेळी म्हणाले. यापुढे आयुष्यात ‘कोरोनापूर्वी आणि कोरोनानंतर’ हे स्वरुप असेल. संबंधित -  EXCLSUSIVE 14 एप्रिलनंतर प्रॉडक्शनसाठी 82 जिल्ह्यांमधील लॉकडाऊन हटवण्याची शक्यता पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये राजकीय नेत्यांना सांगितले की, ‘यापुढे मोठ्या प्रमाणात वर्तणूक, सामाजिक आणि वैयक्तिक बदल घडवून आणायला हवेत.’ कोरोनाव्हायरसविरूद्धच्या लढ्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी या  बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. सध्या देशात कोविड – 19 रुग्णांची संख्या 5,194 वर पोहोचली आहे. या बैठकीत आरोग्य सचिव, गृहसचिव यांनी सद्याची कोरोना व्हायरसची परिस्थिती सविस्तरपणे सांगितली. यापूर्वी काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्याचं आवाहन केलं आहे. सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्याचं आवाहन केलं जात आहे. संबंधित -  3 महिन्यांचा EMI थांबवण्यासाठी मागितला जातोय OTP, पोलिसांचं ‘अलर्ट’ राहण्याचं आवाहन संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात