मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

घराबाहेर पडताना मास्क अत्यावश्यक, नाहीतर अटक होणार

घराबाहेर पडताना मास्क अत्यावश्यक, नाहीतर अटक होणार

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

हा मास्क 3 पदरी पाहिजे. तो घरी तयार केलेला असला तरी चालणार आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क गरजेचा असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

मुंबई 08 एप्रिल : मुंबईत  कोरोनाचा प्रसार वाढतो आहे. दररोज रुग्णांची संख्याही वाढत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने आता आणखी कठोर नियम लागू केला आहेत. घराबाहेर पडताना आणि सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणं अत्यावश्यक केलं आहे. मास्क नसेल तर पोलीस तुम्हाला अटकही करू शकतात असा नियमच महापालिकेने केला आहे. त्याबाबतचं पत्रक आज काढण्यात आलं. हा मास्क 3 पदरी पाहिजे. तो घरी तयार केलेला असला तरी चालणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आता खबरदारी घेणं बंधनकारक ठरणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशींनी नवा आदेश जारी केला आहे.  1887 च्या कायद्यानुसार हा आदेश जारी करण्यात आलेला आहे त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी वावरताना बाजारात जाताना तुम्हाला मास्क घालणं बंधनकारक आहे. इतकच काय सरकारी अधिकारी कर्मचारी यांना यांना कार्यालयात काम करताना ही मास्क बंधनकारक आहे. गाडीमध्ये तुम्ही बसला खासगी गाडी असेल तरीही मास्क बंधनकारक आहे. हा वैद्यकीय दृष्ट्या प्रमाणित मास्क असावा असं नाही तर साधा रुमालाचा बनवलेला किंवा साध्या कापडाचा बनवलेला मास्कही वापरू शकता. असे लक्षात आले की मास्क जर घातला तर करूना चा संसर्ग कमी करणं शक्य होईल त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं महापालिका प्रशासनाने म्हटलं आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना विविध सूचना दिल्या तसंच नवीन सुविधांची घोषणा केली आहे. कोरोनाच्या रुग्णांमुळे अधिक संसर्ग होऊ नये म्हणून आरोग्य सेवेची 4 भागांत विभागणी करण्यात आल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. 1. सर्दी, खोकला आणि ताप असणाऱ्यांनी इतर रुग्णालयात जाऊ नये...अशांसाठी क्युअर क्लिनिकची व्यवस्था...लवकरच माहिती देण्यात येणार आहे. 2. लक्षणं दिसत नाही किंवा सौम्य लक्षणं असणाऱ्यांसाठी वेगळं रुग्णालय महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या इतकी कशी वाढली? उद्धव ठाकरे म्हणतात... 3. तीव्र लक्षणं असणाऱ्यांसाठी वेगळं रुग्णालय 4. गंभीर लक्षणं असणाऱ्या आणि मधुमेह, किडण्यांचे आजार असणाऱ्यांसाठी स्वतंत्र रुग्णालय...हे रुग्णालय पूर्णपणे सुसज्ज असेल 'केंद्रांची योजना अन्नसुरक्षा लाभार्थ्यांसाठीच आहे. सर्वांची सामुहिक जबाबदारी, केंद्र आणि राज्य दोघेही काम करत आहेत. साडेपाच ते सहा लाख लोकांना सरकार रोज जेवण पुरवत आहे. केशरी रेशनकार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्य देणार,' अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे. EXCLSUSIVE 14 एप्रिलनंतर प्रॉडक्शनसाठी 82 जिल्ह्यांमधील लॉकडाऊन हटवण्याची शक्यता देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 5 हजारच्या आसपास पोहोचली असताना महाराष्ट्रातील नवी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यापैकी जवळपास एका रात्रीमध्ये 60 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तब्बल 12 तासांत 60 रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यापैकी मुंबईत 12 तासांत 44, पुण्यात 9, अंगर, अकोला आणि बुलडाण्यात प्रत्येकी एक रुग्ण तर नागपुरात नवीन 4 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. देशभरात सर्वात जास्त रुग्णांची संख्या असणारं राज्य महाराष्ट्र आहे. 5 हजारपैकी 1 हजार 78 रुग्ण तर महाराष्ट्रातील आहेत. मंगळवारी 150 नवीन कोरोनाचे केसेस समोर आल्या होत्या त्यात आता अवघ्या 12 तासांत पुन्हा 60 जणांची भर पडली आहे. (संपादन - अजय कौटिकवार)
First published:

Tags: BMC

पुढील बातम्या