मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Friendship : या मित्रमैत्रिणी कधीच सोडणार नाहीत तुमची साथ; कोणती राशी तुमची बेस्ट फ्रेंड पाहा

Friendship : या मित्रमैत्रिणी कधीच सोडणार नाहीत तुमची साथ; कोणती राशी तुमची बेस्ट फ्रेंड पाहा

तुमची कुंडली तुम्हाला चांगले मित्र बनवण्यात मदत करू शकते. बेस्टलाइफमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसान सुप्रसिद्ध व्यावसायिक ज्योतिषी लिसा स्टारडस्ट यांनीही असे घडू शकते असे म्हटले आहे.

तुमची कुंडली तुम्हाला चांगले मित्र बनवण्यात मदत करू शकते. बेस्टलाइफमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसान सुप्रसिद्ध व्यावसायिक ज्योतिषी लिसा स्टारडस्ट यांनीही असे घडू शकते असे म्हटले आहे.

तुमची कुंडली तुम्हाला चांगले मित्र बनवण्यात मदत करू शकते. बेस्टलाइफमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसान सुप्रसिद्ध व्यावसायिक ज्योतिषी लिसा स्टारडस्ट यांनीही असे घडू शकते असे म्हटले आहे.

  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 29 जुलै : चांगला मित्र प्रत्येकाच्याच नशीबात असतो असं नाही. आयुष्यातील बऱ्याच ठिकाणी मित्रमैत्रिणींची गरज भासते आणि अशावेळी साथ देणारे मित्रमैत्रिणी क्वचितच असतात. बरेच मित्र संकटात साथ सोडून जातात. पण जसा आयुष्याचा जोडीदार राशी पाहून निवडतो, तसंच मित्रमैत्रिणीही राशी पाहून निवडल्याच त्यांची साथही आयुष्यभर लाभेल. मैत्री करताना फक्त स्वभाव नाही तर त्या व्यक्तीची रासही पाहा. राशीनुसार मैत्री केल्यास ही मैत्री कायम टिकेल.

आपण ज्याच्याशी मैत्री केली आहे, तो किंवा ती तुमच्या मैत्रीसाठी योग्य आहे की नाही हे तुम्ही तुमच्या आणि समोरच्या व्यक्तीच्या राशीनुसार ठरवू शकता. बेस्टलाइफमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार सुप्रसिद्ध व्यावसायिक ज्योतिषी लिसा स्टारडस्ट यांनी तुमच्या सोशल सर्कलमध्ये सर्वात चांगला मित्र कसा शोधू शकता, याची माहिती दिली आहे.

मेष आणि तूळ

मेष राशीचे लोक अतिशय डायनामिक, मजेदार, भावनिक, उर्जेने भरलेले आणि आत्मविश्वासी असतात. अशा लोकांसाठी तूळ राशीचा मित्र एक परिपूर्ण निवड असू शकते. तूळ राशीचे लोक खूप संतुलित आणि शांत जीवन जगतात. त्यामुळे दोन विरुद्ध व्यक्तिमत्त्वांच्या लोकांमधील मैत्री एक उत्तम बंध बनू शकते.

तुम्हालाही बसल्याजागी पाय हलवण्याची सवय? वेळीच व्हा सावध, असू शकतो हृदयविकाराचा धोका

वृषभ आणि कन्या

वृषभ राशीचे लोक मित्रांबद्दल खूप निवडक असतात. अशा लोकांना त्यांची मैत्री खूप विश्वास असलेली आणि एकमेकांना आनंदी ठेवणारी असावी असे वाटते. कन्या राशीचे लोक अशा लोकांसाठी उत्तम मित्र असू शकतात. या दोघांमधील मैत्रीमुळे नात्यात आनंद येतो आणि दोघेही एकमेकांची खूप काळजी घेतात.

मिथुन आणि तूळ

या दोघांमधील मैत्री ही एक अतिशय आदर्श मैत्रीही होऊ शकते. तूळ राशीचे लोक आनंदाने मुक्तपणे जगण्यात विश्वास ठेवतात, तर मिथुन राशीचे लोक आपल्या प्रिय तूळ मित्राला इंटेलॅक्युअल पद्धतीने जगण्यासाठी मदत करतात. यामुळे दोघांची मैत्री संस्मरणीय होऊ शकते.

कर्क आणि मीन

कर्क आणि मीन यांच्यातही घट्ट मैत्री असते. कर्क राशीचे लोक त्यांच्या मैत्रीबद्दल खूप भावूक असतात आणि सहज मैत्री करतात. तर मीन राशीचे लोक आकर्षक आणि आदर्शवादी असतात. या दोघांची मैत्री कालांतराने अधिक घट्ट होत जाते.

सिंह आणि कुंभ

सिंह आणि कुंभ राशीला सिस्‍टर्स साइन देखील म्हणतात. सिंह राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक, सर्जनशील आणि मजेदार असते. अशा लोकांना स्वतःसारख्या लोकांशी मैत्री करायला आवडते. त्यामुळे कुंभ राशीशी मैत्री यांच्यासाठी खूप मजेदार आणि पर्सनल असते. तुम्ही मैत्रीमध्ये अहंकार दूर ठेवला तर तुमचा सर्वात चांगला मित्र कुंभ राशीशिवाय दुसरा कोणीही असू शकत नाही.

कन्या आणि वृश्चिक

तुम्ही कन्या राशीचे असाल तर वृश्चिक राशीच्या लोकांसोबत तुमची चांगली मैत्री होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना सखोल चर्चा करण्यात आणि बौद्धिक बाबींमध्ये रस असतो. त्यामुळे तुम्हाला या विषयांवर दीर्घ चर्चा करायला आवडणारी मैत्री हवी. एवढेच नाही तर या दोन राशी नेहमी गरजेच्या वेळी एकमेकांच्या पाठीशी उभ्या असतात. वृश्चिक राशीचे लोक तुमच्यासाठी सर्वोत्तम मित्र असू शकतात.

Relationship Tips : फार काळ धरणार नाही 'ती' अबोला; बायकोचा रुसवा चुटकीत दूर करण्याचा हा घ्या सोपा फंडा

तूळ आणि कुंभ

तूळ आणि कुंभ राशीची मैत्रीही घट्ट असते आणि ते नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. या दोघांमधील परस्पर समज खूप चांगले असतात आणि त्यांना सर्व गॉसिप किंवा गोष्टी एकमेकांमध्ये शेअर करायला आवडतात.

यांची मैत्रीही असते घट्ट

-वृश्चिक आणि मकर

- धनु आणि धनु

-मकर आणि कुंभ

- कुंभ आणि मीन

- मीन आणि वृश्चिक.

First published:

Tags: Astrology and horoscope, Friendship, Lifestyle, Rashibhavishya, Relationships