मुंबई 26 जुलै : बऱ्याच जणांना बसल्याजागी आपला पाय हलवण्याची (Moving leg continuously) सवय असते. तुमच्या ओळखीतील एखाद्या व्यक्तीला अशी सवय असलेलं तुम्ही पाहिलं असेल, किंवा कदाचित तुम्हालाही तशी सवय असेल. बऱ्याच लोकांना आपल्याला ही सवय कधी लागली हेही लक्षात येत नाही किंवा मग याकडे केवळ एक सवय म्हणून कित्येक जण दुर्लक्ष करतात. मात्र, याकडे दुर्लक्ष करणं खरं तर धोक्याचं ठरू शकतं.
Tailbone Pain : माकडहाडाच्या वेदनांमुळे त्रस्त झालाय का? हे 4 घरगुती उपाय करून बघा परिणाम
ही सवय खरं तर रेस्टलेस सिंड्रोमचं (Restless Syndrome) लक्षण आहे. शरीरात लोहाची कमी झाल्यानंतर व्यक्ती अशाप्रकारे पाय हलवू लागतात. यामुळेच पायाला वारंवार मुंग्याही येतात. तुम्हालाही अशी सवय असेल, तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे. कारण एका अभ्यासानुसार, रेस्टलेस सिंड्रोम असणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका (Restless Syndrome and Heart attack) येण्याची शक्यता वाढते. लोकमत न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
रेस्टलेस सिंड्रोमची लक्षणं आणि कारणं
रेस्टलेस सिंड्रोमच्या लक्षणांमध्ये (Restless syndrome symptoms) पायाला मुंग्या येणं, अतिचिंता करणं, तणाव वाढणं आणि पाय हलवण्याची सवय लागणं अशा गोष्टींचा समावेश होतो. किडनीचे आजार, पार्किन्सन्स, मधुमेह, हृदयविकार, उच्चरक्तदाब असे आजार झालेल्या व्यक्ती तसंच डिलिव्हरीची तारीख जवळ आलेल्या गर्भवती महिला या सर्वांनाही रेस्टलेस सिंड्रोम जाणवू शकतो. यासोबतच अॅलर्जीची औषधं घेणाऱ्या व्यक्ती, मद्यपान करणाऱ्या व्यक्ती यांनाही ही समस्या (Restless Syndrome causes) उद्भवू शकते.
Stomach Ulcer : पोटात सतत अल्सर होत असल्यास दुर्लक्ष करू नका, कोलन कॅन्सरचीही असते शक्यता
काही घरगुती उपाय
रेस्टलेस सिंड्रोम ही मुख्यत्वे शरीरातील लोह कमी झाल्याने होतो. त्यामुळे तुम्हालाही ही समस्या असल्यास डाएटमध्ये लोहयुक्त पदार्थांचा समावेश करणं फायद्याचं ठरतं. यासोबतच काही विशिष्ट प्रकारचे व्यायाम केल्यानेदेखील या समस्येपासून सुटका (Restless Syndrome cure) होऊ शकते.
वारंवार पाय हलवणं, मनावर ताण येणं अशी लक्षणं जास्त दिवस राहिली तर डॉक्टरांची भेट घेणं गरजेचं आहे. विशेषतः 35 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या व्यक्तींनी याबाबत खबरदारी घेणं गरजेचं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांमुळे ही समस्या वेगाने दूर होऊ शकते. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही, तर रेस्टलेस सिंड्रोममुळे हृदयविकाराचा झटकादेखील येऊ शकतो. त्यासोबतच, यामुळे इतर गंभीर आजारदेखील उद्भवू शकतात. त्यामुळे वेळीच याबाबत जागरूक होऊन योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे. तसंच आपल्या आरोग्यासाठी साध्यासाध्या गोष्टींचा समावेश रूटिनमध्ये करणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Heart Attack