मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Relationship Tips : फार काळ धरणार नाही 'ती' अबोला; बायकोचा रुसवा चुटकीत दूर करण्याचा हा घ्या सोपा फंडा

Relationship Tips : फार काळ धरणार नाही 'ती' अबोला; बायकोचा रुसवा चुटकीत दूर करण्याचा हा घ्या सोपा फंडा

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

रागावलेल्या बायकोला मनवणं हे नवऱ्यांसमोरील सर्वात मोठं आव्हान असतं.

मुंबई, 28 जुलै : पती-पत्नीच्या नात्यात (Husband-Wife Relation) विश्वास, सामंजस्य आणि प्रेम महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा जोडप्यांमध्ये कोणत्याही कारणांमुळे वादविवाद होत असतात. काही वेळी एकमेकांना समजून घेतानादेखील पती आणि पत्नीत वाद (Dispute) होतात. परंतु, सातत्याने होणारे वाद, दीर्घ काळ अबोला आदी गोष्टी नात्यावर (Relationship) गंभीर परिणाम करू शकतात. प्रसंगी नातं संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाद झाल्यानंतर पत्नीची समजूत काढणं हे पुरुषांसाठी मोठं अवघड काम असतं. नाराज पत्नीची समजूत काढण्यासाठी नेमकं काय करावं, हे पुरुषांना बऱ्याचदा समजत नाही; पण काही सोपे उपाय करून पत्नीची नाराजी दूर करता येते.

एका संशोधनानुसार, महिलांच्या तुलनेत पुरुष भावनिकदृष्ट्या थोडे कमकुवत असतात. त्यामुळे पती-पत्नीत भावनिक अ‍टॅचमेंट (Emotional Attachment) महत्त्वाची आहे. अनेकदा महिलांना आपल्या पतीची एखादी छोटी गोष्टदेखील खटकते. त्यामुळे त्या नाराज होणं स्वाभाविक आहे. नाराज पत्नीची समजूत काढणं हे जगातलं सर्वांत अवघड काम समजलं जातं. कारण तिच्या मनात नेमकं काय हे ओळखणं कठीण असतं; मात्र काही उपायांच्या आधारे पती आपल्या पत्नीची नाराजी दूर करू शकतात.

पत्नी नेमक्या कोणत्या कारणामुळं नाराज आहे, हे पतीला पटकन लक्षात येत असेल तर तो उत्तम पती समजला जातो. तुम्हाला तुमच्या पत्नीच्या नाराजीचं कारण समजत नसेल, तर ते प्रथम जाणून घेण्याचा प्रयत्न करा. पत्नीसोबत एकांतात संवाद साधा, तिचं म्हणणं ऐकून घ्या. यामुळे नात्यातली समस्या लगेच दूर होईल.

हे वाचा - तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या प्रेमात पडलाय का? `या` गोष्टींवरून होईल स्पष्ट

महिलांना शॉपिंग (Shopping) करायला खूप आवडतं. कपाटात कितीही कपडे असले तरी महिला शॉपिंगसाठी नेहमीच तयार असतात. तुमची पत्नी तुमच्यावर नाराज असेल तर तिचा मूड ठीक करण्यासाठी तिला शॉपिंगला घेऊन जा. शॉपिंगदरम्यान नाराजीचं कारण कळू शकतं. शॉपिंगवेळी माफी मागितली तर पत्नी तुम्हाला नक्कीच माफ करू शकते.

शारीरिक संबंध (Physical Relation) दोन व्यक्तींना भावनिकरित्या जोडण्यास मदत करतात, असं अनेक संशोधनांमधून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे तुम्ही शारीरिक संबंधाच्या माध्यमातूनही पत्नीची नाराजी दूर करू शकता.

प्रेम व्यक्त करण्यासाठी पत्नीला फूल (Flower) किंवा भेटवस्तू (Gift) द्यावं, ही गोष्ट सर्वांना माहिती आहे. पत्नीची नाराजी दूर करण्यासाठी फूल आणि भेटवस्तू देणं हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ऑफिसमधून येताना एखादा सुंदर बुके, गजरा किंवा गुलाबाचं फूल आणावं आणि ते पत्नीला प्रेमानं द्यावं. यामुळे तिची नाराजी दूर होईल. तुम्हाला वाटलं तर एखादी छोटीशी भेटवस्तूही तुम्ही पत्नीसाठी आणू शकता. यात तुम्ही नेकलेस, केक किंवा कुशनसारख्या छोट्या भेटवस्तू पत्नीला देऊ शकता. यामुळे तिचा राग नक्कीच शांत होईल.

बहुतांश घरांमध्ये पत्नीच जेवण तयार करते. परंतु, पती स्वयंपाक करणार हे ऐकल्यावर पत्नीच्या मनात कुठे तरी उत्सुकता निर्माण होते. नाराज पत्नीची समजूत काढण्यासाठी तुम्ही तिच्या आवडीची एखादी डिश बनवू शकता आणि तुमच्या हातानं तिला खाऊ घालू शकता.

हे वाचा - ही फक्त मैत्री की प्रेम? समोरच्या व्यक्तीच्या वागण्यावरून त्याच्या मनातलं कसं ओळखायचं?

सध्याची जीवनशैली (Lifestyle) तणाव वाढवणारी आहे. घर आणि ऑफिस सांभाळताना महिलांना तारेवरची कसरत करावी लागते. अशा वेळी त्यांना क्षुल्लक कारणावरूनही राग येणं साहजिक आहे. तुमची पत्नी तुमच्यावर रागावली असेल तर तिचा राग शांत होण्यासाठी वेळ द्या. एखाद्या गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया दिली तर वाद वाढू शकतात. पत्नीचा राग शांत झाल्यावर 15 ते 20 मिनिटं तिच्यासोबत घालवा आणि तिची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करा. यामुळे नात्यातलं प्रेम वाढतं आणि ते जास्त दृढ होतं.

First published:

Tags: Couple, Lifestyle, Relationship, Wife and husband