नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : हिंदू धर्मात रक्षाबंधन
(Raksha Bandhan) हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक मानला जातो. हा सण दरवर्षी श्रावण
(Shravan) महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी बहिणी भावाच्या मनगटांवर राखी
(Rakhi) बांधतात आणि भावाच्या समृद्धीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी
(Prosperity & Longevity) प्रार्थनाही करता. तर भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करण्याचं वचन
(Promise) देतात आणि गिफ्टही
(Gift) देतात. उद्या रक्षाबंधन आहे त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. भावासाठी छानशी राखीही तुम्ही शोधत असाल. पण फक्त डिझाइन किंवा तुमच्या आवडीनुसार नाही तर भावाच्या राशीनुसार राखी निवडा.
गेल्यावर्षी प्रमाणे याहीवर्षी रक्षा बंधनवर कोरोनाचं (Corona) सावट आहे. कोरोना थोडा नियंत्रणात आला असला तरी, त्याच्या भीतीने बाजारामध्ये तेवढी गर्दी दिसत नाही. पण, वर्षातून एकदा येणाऱ्या सणासाठी भाऊ आणि बहिणाच्या मनात तितकंच प्रेम असतं. त्यामुळे यावर्षी सगळेच जण आनंदात आहेत आणि घराघरात रक्षाबंधनची तयारी सुरू आहे. ज्योतिष शास्त्रानुसार
(According to Astrology) रक्षा बंधनच्या दिवशी बहिणीने भावाला त्याच्या राशीनुसार राखी बांधली तर, फायदा होणार आहे.
(
पावसाळ्यात वाढला माशांचा त्रास? अशा घरगुती स्प्रेने एकही माशी घरात येणार नाही)
मेष रास
मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळे बहिणींनी त्यांच्या मेष राशीच्या भावांना लाल रंगाची राखी बांधली तर त्यांना शुभ फळ मिळेल.
वृषभ रास
शुक्र वृषभ राशीचा स्वामी आहे. म्हणून, वृषभ राशीच्या भावांना या वर्षी त्यांच्या बहिणीने निळ्या रंगाची राखी बांधणं अधिक फलदायी ठरेल.
मिथुन रास
बुद्धीचा देव म्हणजे बुध ग्रह मिथुन राशीचा स्वामी ग्रह मानला जातो. तर, मिथुन राशीच्या भावांच्या मनगटावर फक्त हिरव्या रंगाची राखी बांधणं शुभ ठरेल.
(
टेन्शनमुळे दुखतंय डोकं? चंदनाचा लेप संपवेल वेदना; या पद्धतीने वापर करा)
कर्क रास
चंद्र हा कर्क राशीचा स्वामी मानला जातो. म्हणून जर कर्क राशीच्या भावांना त्यांच्या बहिणींनी पांढऱ्या रंगाची राखी बांधली तर, त्यांचे सर्व प्रकारचे आरोग्याचे त्रास कमी होतील.
सिंह रास
सूर्य देव सिंह राशीचा आहे. म्हणून या वर्षी या राशीच्या भावांना त्याच्या बहिणींनी पिवळ्या किंवा लाल रंगाची राखी बांधली तर, त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात आणि करिअरमध्ये अफाट यश मिळणार आहे.
(
तिखटपणामुळे खाणं टाळू नका! झणझणीत मिरचीचेही आहेत आरोग्यासाठी फायदे)
कन्या रास
बुध कन्या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे कन्या राशीच्या भावांसाठी यावर्षी हिरव्या रंगाची राखी बांधणं शुभ ठरेल. त्यामुळे त्यांच्यात तर्कशक्तीचा विकसित होईल आणि त्यांची सर्व अपूर्ण कामं पूर्ण करण्याची क्षमता येईल.
तुळ रास
शुक्र तुळ राशीचा स्वामी आहे. या राशीच्या भावांना बहिणींनी मनगटावर गुलाबी रंगाची राखी बांधली पाहिजे. कारण यामुळे त्यांना त्यांचं बहिणीसोबतचं नातं पूर्वीपेक्षा अधिक दृढ होण्यास मदत होईल.
(
चुकूनही शिजवू नका ‘हे’ पदार्थ; फायद्याऐवजी होईल नुकसान)
वृश्चिक रास
मंगळ हा वृश्चिक राशीचा स्वामी मानला जातो. रक्षा बंधनच्या दिवशी वृश्चिक राशीच्या भावांना बहिणींनी लाल किंवा मरून रंगाची राखी बांधतील तर, त्यांच्या भावांना शत्रूंवर विजय मिळवण्याची शक्ती मिळेल.
धनु रास
धनु राशीचा स्वामी गुरु मानला जातो. त्यामुळे धनु राशीच्या भावांना पिवळ्या रंगाची राखी बांधावी. कारण यामुळे त्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त होण्यास मदत होईल.
मकर रास
मकर राशीचा स्वामी शनी देव हा कर्म फळ देणारा मानला जातो. त्यामुळे मकर राशीच्या भावांच्या हातावर निळ्या रंगाची राखी बांधावी म्हणजे त्यांना शनिदेवाचे विशेष आशिर्वाद मिळतील.
(
पृथ्वीच्या दिशेने येतेय बुर्ज खलिफापेक्षा मोठी उल्का,आज 3 वाजता होऊ शकतो विध्वंस)
कुंभ रास
शनिदेव हा कुंभ राशीचा स्वामी आहे. कुंभ राशीच्या भावांच्या मनगटावर डार्क निळ्या रंगाची राखी बांधणं शुभ ठरेल. त्यामुळे शनि देवाशी संबंधित प्रत्येक दोष त्याच्या कुंडलीमधून संपेल. तर, त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांना चांगले परिणाम मिळतील.
मीन रास
मीन राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे. त्यामुळे मीन राशीच्या भावांना बहिणींनी फक्त पिवळ्या रंगाची राखी बांधणं अनुकूल असणार आहे. कारण यामुळे त्यांची सर्व रोगांतून मुक्त होण्याची अधिक शक्यता असेल.
(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.