• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • पावसाळ्यात वाढला माशांचा त्रास? अशा घरगुती स्प्रेने एकही माशी घरात येणार नाही

पावसाळ्यात वाढला माशांचा त्रास? अशा घरगुती स्प्रेने एकही माशी घरात येणार नाही

घरात येणाऱ्या माशांच्या (Flies) त्रासाने वैतागला असाल तर, मिरची, आलं, व्हिनेगर सारखे पदार्थ वापरून त्यांचा बंदोबस्त करा.

 • Share this:
  दिल्ली, 21 ऑगस्ट :  पावसाळ्यातल्या वातावरणामध्ये (Monsoon Atmosphere) आजारपण वाढतात कारण, याच काळामध्ये मच्छर, माशा, किडे, जंतू यांची वाढ होत असते. त्यामुळेच पावसाळ्यामध्ये घरात स्वच्छता (Cleanliness in the House) ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. त्यातच घरात लहान मुलं असतील तर, त्यांच्या आरोग्याची (Health) काळजी जास्त वाटत राहते. पावसाळ्यामध्ये मच्छरांबरोबरच घरात माशा (Mosquitoes & Flies) येण्याचा त्रासही वाढतो. खूपदा घरात जास्त माशा यायला लागल्यामुळे वातावरण खराब (Bad Weather) होतं. स्वयंपाक घरामध्ये माशा आल्या तर, जेवण करण्याचीही इच्छा होत नाही. घरातल्या माशा घरभर फिरतात. स्वयंपाक घरातल्या माशा पदार्थांवर भांड्यांवर बसतात. भांड्यावर माशा बसल्या असतील तर, अशी भांडी वापरण्याची इच्छा होत नाही. शिवाय जेवणावर माशा बसल्यास ते पदार्थ टाकून द्यावे लागतात. माशा या बॅक्टेरिया आणि जंतूंच्या(Bacteria & Germs) वाहत मानल्या जातात. घराची बाहेरील घाणीवर बसणाऱ्या माश्या घरामध्ये अनेक सूक्ष्म जंतू घेऊन येतात. घरात येणार्‍या माशांचा त्रास वाढला असेल तर, काही घरगुती उपाय करून पाहा. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करता येतो.  अ‍ॅपल साडर व्हिनेगरमध्ये निलगिरीचं तेल घाला आणि एका स्प्रे बॉटल मध्ये भरा. माशा येण्याऱ्या ठिकाणी मारा. कापूर कापराच्या वासामुळे देखील माश्या पळून जातात. 8 ते 10 कापरा वड्या घेऊन त्याची पावडर तयार करा. एका भांड्यात पाण्यामध्ये ही पावडर एकत्र करून स्प्रे बॉटल मध्ये भरा. नंतर स्प्रे करा. (चुकूनही शिजवू नका ‘हे’ पदार्थ; फायद्याऐवजी होईल नुकसान) तुळशीची पानं जवळपास सगळ्यांच्याच घरामध्ये तुळस असते. तुळशीच्या पानांच्या वासामुळे माशा घरामध्ये येत नाहीत. तुळशीच्या पानांपासून होममेड स्प्रे तयार करता येतो. यामुळे माशा पळून जातात. याकरता तुळशीच्या 15 पानांची पेस्ट तयार करा आणि गरम पाण्यात टाकून ठेवा. थोड्या वेळाने हे पाणी गाळून स्प्रे बॉटलमध्ये टाका आणि माशा येणाऱ्या ठिकाणी स्प्रे करा. मिरची स्प्रे जास्त प्रमाणात माशा घरात येत असतील तर, मिरची स्प्रेचा वापर करू शकता. मिरचा स्प्रेच्या वासामुळे माशा पळून जातात. मिरची स्प्रे बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. 2 ते 3 मिरचींची पावडर तयार करा. ही पावडर एअरटाईट कंटेनरमध्ये भरून उन्हामध्ये ठेवून 2 ते 3 दिवसानंतर आणि मिरची पावडर पाण्यात मिसळून स्प्रे बॉटलमध्ये भरून वापरा. (तुमच्या मनातही आहेत का पाळीबद्दलचे ‘हे’ गैरसमज ? जाणून घ्या तथ्य) आलं आल्याच्या वासामुळे देखील माशा घर सोडून पळून जातील. 4 कप पाण्यामध्ये 2 मोठे चमचे सुंठ पावडर किंवा आल्याची पेस्ट घाला आणि एकत्र करा. हे मिश्रण गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि ज्या ठिकाणी माशा येतात त्या ठिकाणी स्प्रे करा. (त्वचेवर चट्टे उठून खाज येत असेल तर करा ही टेस्ट; दुर्लक्ष केल्याने अवघडतील सांधे) एसेन्शियल ऑइल लवंग तेल, पेपरमिंट ऑइल, ओव्याचं तेल, लेमनग्रास ऑइल किंवा दालचिनीचं तेल या सारखे एसेन्शियल ऑइल देखील माशा पळवून लावण्यासाठी वापरता येऊ शकतात. 2 कप पाणी 2 कप व्हिनेगर आणि 10 थेंब कोणतही वापरून स्प्रे तयार करा. स्प्रे बॉटलमध्ये भरून माशा येणाऱ्या ठिकाणी स्प्रे करा.
  Published by:News18 Desk
  First published: