Home /News /lifestyle /

टेन्शनमुळे दुखतंय डोकं? चंदनाचा लेप संपवेल वेदना; या पद्धतीने वापर करा

टेन्शनमुळे दुखतंय डोकं? चंदनाचा लेप संपवेल वेदना; या पद्धतीने वापर करा

चेहऱ्यावर पिंपल्सचा त्रास असेल तर, चंदन लावल्याने त्रास मुरुम कमी होतात.

चेहऱ्यावर पिंपल्सचा त्रास असेल तर, चंदन लावल्याने त्रास मुरुम कमी होतात.

आयुर्वेदानुसार (According to Ayurveda) चंदनाला औषधी वनस्पती मानलं गेलं आहे.सौंदर्याबरोबर डोकंदुखीतही चंदनाच्या लेपाचा फायदा होतो.

    नवी दिल्ली,21 ऑगस्ट : आजकाल धावपळीच्या आयुष्यामुळे थकवा येणं, मनावर ताण (Mental Stress) वाढणं हे त्रास सगळ्यांनाच होऊ लागलेले आहेत. बदलेल्या लाईफस्टाईलचा (Lifestyle), खाण्यापिण्याच्या सवयींचा आपल्या शरीरावर ज्या प्रमाणे परिणाम(Effect)होतो. तेवढाच परिणाम मानसिक आरोग्यावरही होतो. बऱ्याच लोकांना तिव्र डाकेदुखीचा (Headache) त्रास होतो. डोकं जास्त दुखत असेल तर, औषधं किंवा घरगुती उपचारांची (Home Remedies) मदत घ्यावीच लागते. त्यासाठी सुगंधाचा वापरही करता येतो. तसाच चंदनाचाही आयुर्वेदिक औषध(Ayurvedic Medicine) म्हणून होतो. चंदनामुळे शांत आणि थंड वाटतं. त्यासाठी चंदन पावडर किंवा चंदनाचं खोड उगाळून लावता येतं. चंदन म्हणजे काय ? आयुर्वेदात खास औषध म्हणून चंदन वापरलं जातं. चंदन एक नैसर्गिक वेदना निवारक आहे त्यामुळे स्ट्रेस, थकवा आणि डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळतो. आयुर्वेदानुसार चंदनाची झाडं वेगवेगळ्या प्रकारची असतात. देश -विदेशात चंदनाच्या विविध जाती आढळतात. यापैकी ओरिसामध्ये सापडणारं चंदन सर्वोत्तम मानलं जातं. (तुमच्या मनातही आहेत का पाळीबद्दलचे ‘हे’ गैरसमज ? जाणून घ्या तथ्य) चंदन लेपाचे फायदेडोकेदुखी आराम आपल्या भुवयांच्या मध्य भागात मज्जातंतूंचा समूह असतो आणि त्यावर चंदनाची पेस्ट लावल्यावर नसा थंड होतात. जास्तवेळ उन्हात राहिल्यामुळे त्रास होत असेल तर चंदन पेस्टच्या मदतीने आराम मिळवू शकता. (चुकूनही शिजवू नका ‘हे’ पदार्थ; फायद्याऐवजी होईल नुकसान) थकवा आणि तणाव दूर चंदनाचा नैसर्गिक सुगंध सेरोटोनिन हार्मोन्सचं उत्पादन वाढवतो त्यामुळे थंड वाटायला लागतं. सेरोटोनिन हार्मोन्स तणावाची पातळी कमी करतात. डोक दुखत असेल किंवा स्ट्रेस जाणवत असेल तर, घेतल्यास बरं वाटतं. त्वचेसाठी उत्तम चेहऱ्यावर पिंपल्सचा त्रास असेल तर, चंदन लावल्याने त्रास मुरुम कमी होतात. यासाठी चंदन सहानेवर उगाळ्या ही पेस्ट तोंडात लावा. यामुळे मुरुमं आणि चेहऱ्यावरील टॅनिंगची समस्या दूर होते. (तिखटपणामुळे खाणं टाळू नका! झणझणीत मिरचीचेही आहेत आरोग्यासाठी फायदे) वापरण्याची पद्धत आवश्यकतेनुसार चंदन पावडर घ्या आणि त्यात थोडा कापूर घाला. त्यात गुलाब पाणी घालून पेस्ट करा. डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी ही पेस्ट कपाळावर लावा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle, Skin care, Stress

    पुढील बातम्या