मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पृथ्वीच्या दिशेने येतेय बुर्ज खलिफापेक्षा मोठी उल्का, आज दुपारी 3 वाजता होऊ शकतो विध्वंस

पृथ्वीच्या दिशेने येतेय बुर्ज खलिफापेक्षा मोठी उल्का, आज दुपारी 3 वाजता होऊ शकतो विध्वंस

शनिवारी दुपारी पृथ्वीच्या जवळून एक महाकाय उल्का (Asteroid To Hit Earth) जाणार आहे. त्यामुळे पृथ्वीवर काय परिणाम होणार आहेत, वाचा इथे

शनिवारी दुपारी पृथ्वीच्या जवळून एक महाकाय उल्का (Asteroid To Hit Earth) जाणार आहे. त्यामुळे पृथ्वीवर काय परिणाम होणार आहेत, वाचा इथे

शनिवारी दुपारी पृथ्वीच्या जवळून एक महाकाय उल्का (Asteroid To Hit Earth) जाणार आहे. त्यामुळे पृथ्वीवर काय परिणाम होणार आहेत, वाचा इथे

  • Published by:  Janhavi Bhatkar
पृथ्वीची निर्मिती कशी झाली याकरता अनेक संकल्पना (Space Theories) मांडण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप कुणी एका उत्तरावर एकमत झालेले नाही. दरम्यान या कोट्यवधी वर्षात पृथ्वीवर अनेक बदल झाले आहेत. या नैसर्गिक आणि जैविक बदलात पृथ्वीवरील अनेक जीवजंतू, प्राणी पृथ्वीवरुन गायब झाले आहेत. यासाठी सर्वात महत्त्वाचे उदाहरण डायनासोर (How Dinosaur Extinct) आहेत. असे म्हटले जाते की, पृथ्वीवर एक विशालकाय उल्का धडकल्याने डायनासोर्सचा अंत झाला. दरम्यान त्यानंतरही अनेकदा उल्का पृथ्वीवर आदळण्याच्या घटना घडल्या आहेत. न्यूज18 हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना काळात आणखी एक उल्का पृथ्वीवर उलथापालथ करण्याची शक्यता आहे. नासाच्या माहितीनुसार, 21 ऑगस्ट रोजी पृथ्वीच्या अगदी जवळ एक उल्का आदळण्याची शक्यता आहे. ही उल्का इतकी मोठी आहे की दुबईतील बुर्ज खलिफा देखील त्यापुढे फिका ठरेल. ही उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे चुकून जरी पृथ्वीवर ही उल्का आदळली तर मोठं नुकसान होईल. हे वाचा-इंग्लंडच्या माजी कॅप्टनचा दावा, 'बुमराह-शमीच्या आई-वडिलांनीही कधी...' नासाने दिला महत्त्वाचा इशारा नासाच्या रेकॉर्ड्सच्या मते, हा उल्कापिंड एक हजार दगडांचा समुह आहे. याला 2016 AJ193 असं नाव देण्यात आलं आहे. ही उल्का 58 हजार 538 mph च्या स्पीडने पुढे सरकत आहे. नासाची या उल्कापिंडावर नजर ठेवून आहे, ज्या वेगाने 2016 AJ193 पुढे सरकत आहे त्यावरुन असा अंदाज बांधण्यात आला आहे की 21 ऑगस्ट रोजी पृथ्वीजवळून जाईल. साधारण आज दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी ही उल्का पृथ्वीजवळून जाईल नासाने दिलेल्या माहितीनुसार, ही उल्का आयफेल टॉवरपेक्षाही मोठी आहे. अगदी बुर्ज खलिफा देखील या विशालकाय asteroid समोर लहान आहे. असा अंदाज आहे की एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षा तीन पटींनी मोठा याचा आकार आहे. 2016 पासून वैज्ञानिक या उल्कापिंडावर नजर ठेवून आहेत. वैज्ञानिकांच्या मते गुरुत्वाकर्षणाचा परिणाम झाला तर ही उल्का पृथ्वीवर आदळू शकते, तसं न झाल्यास ती पृथ्वीजवळून जाणार आहे. हे वाचा-पुढील 4 तासांत मुंबईसह 'या' जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज, पुण्यात काय स्थिती? उल्का म्हणजे काय? आकाशात अनेक खगोलीय वस्तू फिरत असतात. अशा वस्तू पृथ्वीच्या कक्षेत येतात, पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करताना त्यांचे घनअस्तित्व संपून जाते आणि त्या जळून जातात. काही मोजक्याच उल्का या पाषाणाच्या स्वरूपात पृथ्वीवर पडत असतात. त्यांचा आकार लहान किंवा मोठा असू शकतो.
First published:

Tags: Asteroid

पुढील बातम्या