नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. या वीकमध्ये दरदिवशी एक खास डे सेलिब्रेट केला जातो. आज या वीकमधला किस डे असून ट्वीटरवरही हा हॅशटॅग #KissDay ट्रेंड करतो आहे. किस डेनिमित्ताने एका ट्वीटर युजरने एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. एका व्यक्तीने एकाचवेळी तीन अभिनेत्रींना किस केल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. memer_badguy या ट्वीटर युजरने हा किस डे स्पेशल व्हिडीओ #KissDay असं म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्तावरुन जाताना दिसतो आहे. तो चालताना एका बंद दुकानाच्या शटरवर तीन अभिनेत्रींचं पोस्टर लावलेलं पाहतो. तो ते तीन पोस्टर बघत-बघत पुढे जातो खरा, पण काही सेकंदाच परत मागे येतो. सामसूम रस्त्यावर कोणीच नसल्याचं पाहत तो पुन्हा मागे येत त्या तीन अभिनेत्रींच्या पोस्टरला किस करतो. त्याचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालं आहे.
हा भन्नाट व्हिडीओ नेमका कुठला आहे ते समजू शकलेलं नाही. तसंच ते पोस्टर कोणत्या अभिनेत्रींचे आहेत हेदेखील समजत नाही. पण रात्रीच्या वेळी त्याने सेलिब्रेट केलेला किस डे सीसीटीव्हीमध्ये मात्र कैद झाला आहे.