नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : जगातील नंबर वन म्हणून ओळखली जाणारी मॅचमेकिंग सर्व्हिस शादी डॉट कॉमने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने व्हॅलेंटाईन डे बाबतच्या भावना समजून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केलं. कपल्स आपल्या पार्टनरसोबत हा दिवस साजरा करतात पण जे सिंगल आहेत, त्यांच्यासाठी या दिवसाचं तितकसं खास काही नसतं. पण शादी डॉट कॉमने केलेल्या सर्व्हेनुसार, व्हॅलेंटाईन डेला 46 टक्के सिंगल्सनी काय मग आज काय प्लॅन हा सर्वात त्रासदायक प्रश्न विचारला जात असल्याचं म्हटलं आहे. यापैकी काही लोकांनी व्हॅलेंटाईन डेदिवशी अनावश्यक दबाव असल्याचं म्हटलं आहे. या दिवशी मित्र सर्वाधिक त्रासदायक भाग वाटतात, ज्यात 64 टक्क्यांहून अधिक लोकांनी त्यांना जवळच्या व्यक्तीकडून, खास मित्रांकडून काहीतरी चिडवण्याचा अनुभव येत असल्याचं सांगितलं आहे.
(वाचा- मी प्रेमात तर पडले नाही ना? इथं मिळेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर )
या दिवसाच्या सामाजिक दबावाचा आश्चर्यकारक आणि अपेक्षित परिणाम असा होतो की, या दिवशी एखाद्यासोबत असण्याचा दबाव असल्याचं 40 टक्के लोकांनी म्हटलं आहे. तर या दिवशी एकटेपणा जाणवणं ही बाब सर्वात कठिण असल्याचं 62 टक्के सिंगल्सचं म्हणणं आहे. Shaadi.com च्या #TakeThePressureOff कॅम्पेनमधून हा सर्व्हे 1200 सिंगल्समध्ये करण्यात आला आहे.