मुंबई, 24 जानेवारी : हल्लीची लहान मुलं खूप फास्ट झाली आहेत, त्यांना लगेच समजतं, इतरांचं बघून लगेच तसंच बोलतात अशा अनेक गोष्टी लहान मुलांबद्दल नेहमी बोलल्या जातात. चिमुरड्यांचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरलही होत असतात. असाच एका चिमुकल्याचा एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल झाला आहे. ‘मम्मी प्लीज शादी करा दो, बच्चा भी पैदा हो जाएगा, आप अपने पतीदेव के साथ जियो’ असं म्हणत या चिमुकल्याने त्याचं लग्न करून देण्याची थेट मागणीच त्याच्या आईकडे केली आहे. या अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकल्याने त्याच्या मुलीबाबतच्या अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत. एखादी चांगली काम करणारी, माझी मम्मी काम करून थकते, तर ती माझ्यासाठी सर्वकाही करेल, जी माझ्यासोबत खेळेलही अशा मुलीशी लग्न करायचं असल्याचं तो सागंतोय. या मुलाचा व्हिडीओ त्याच्या आईनेच शूट केला आहे. त्याची आई त्याला मुलीबद्दलही प्रश्न विचारते, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही त्याने दिली आहेत. व्हिडीओत या चिमुकल्याचे हावभावही अगदी खरे असून तो खरोखरंच त्याचं सगळ म्हणणं आईकडे मांडत असून लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आईच्या प्रश्नाला उत्तर देताना तो, तू तुझ्या पतीसोबत राहा असंही तो म्हणतोय. तीन जणांच्या फॅमिलीमध्ये मजा येत नाही, आपण चार जण राहू, चार जणांच्या फॅमिलीमध्ये मजा येईल, एखादं मुलंही होईल असंही तो म्हणतो.
त्याचा हा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक नेटकऱ्यांची त्याला पसंतीही मिळते आहे.