Home /News /viral /

आजी रॉक्स बाकी सगळे शॉक, 89व्या वर्षी चालवली नातवाची हुंदई कार! पाहा हा VIDEO

आजी रॉक्स बाकी सगळे शॉक, 89व्या वर्षी चालवली नातवाची हुंदई कार! पाहा हा VIDEO

कारचा कोणताही गंध नसलेल्या आजीने चक्क फोर व्हिलर चालवली आहे. Age is just a Number, वय हा केवळ एक आकडा आहे हेच या आजीने सिद्ध केलं आहे. आजीचा हा कार ड्रायव्हिंगचा व्हिडीओ एकदा पाहाच...

  कल्याण, 23 जानेवारी : एखादी गोष्ट मनाशी पक्की केली, ठरवली की, कोणतीचं गोष्ट अवघड नसते. असाच प्रत्यय एका 89 वर्षीय आजीने दिला आहे. आधीपासून कारचा कोणताही गंध नसलेल्या आजीने चक्क फोर व्हिलर चालवली आहे. Age is just a Number, वय हा केवळ एक आकडा आहे हेच या आजीने सिद्ध केलं आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील दहागाव खेड्यात राहणाऱ्या 89 वर्षांच्या आजीने कार चालवण्याची किमयाच केली आहे. कधीही कारमध्ये ड्रायव्हर सीटच्या बाजूलाही न बसलेल्या आजीने या वयातही आत्मविश्वास, जिद्द, आवड, आपल्या हौशेच्या जोरावर कार चालवली आहे. आजीचा नातू विकास भोईर याने आजीला जवळपास 3 ते 4 वर्षांपूर्वी गाडी चालवायला शिकवलं होतं. त्यावेळी आजी काहीशी आजारी असताना नातवाने तिला गाडी चालवणार का? असा प्रश्न केला. आजीनेही लगेच तयारी दाखवली आणि नातवाने तिला क्लच, गिअर, ब्रेक, स्टेअरिंग, एक्सलेटर सगळ्याची माहिती करून होती. त्या 3-4 वर्षांनंतर मात्र तिने गाडी हातात घेतली नव्हती.

  (वाचा - ...आणि अचानक खचला रस्ता; मधोमध पडलं भलमोठं भगदाड, पाहा हा VIDEO)

  अचानक पुन्हा नातवाने आजीला गाडी चालवणार का विचारलं आणि आजी लगेचच तयार झाली. आश्चर्याची बाब म्हणजे, 3-4 वर्षांपूर्वी शिकवलेलं तिला सगळं आठवत होतं, माहिती होतं. आजीने पुन्हा गाडी चालवली आणि नातवाने अभिमानाने आजीचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया चांगलाच व्हायरल होतो आहे. सर्वसामान्यपणे एका ठराविक वयानंतर काही नवीन गोष्टी करण्यास भीती वाटते किंवा काही गोष्टी विसरल्या जातात. पण या आजी याला अपवाद ठरल्या. 89 व्या वर्षीही या आजीचा आत्मविश्वास, जिद्द अतिशय तगडी असून तिने या वयात कार चालवत सर्वांसाठीच एक प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवलं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या