रोहित शर्मा आणि राहुल द्रविड
मुंबई, 25 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून करोडो भारतीय चाहत्यांना रविवारी दिवाळी भेट मिळाली होती. रविवारच्या महामुकाबल्यात टीम इंडियानं पाकिस्तानचा पराभव केला आणि टी20 वर्ल्ड कप मध्ये विजयी सुरुवात केली. त्यांतर भारतीय संघही दणक्यात हा सर्वात मोठा विजय साजरा करण्याच्या तयारीत होता. पण दुसऱ्या दिवशी सकाळीच मेलबर्नहून सिडनीला जाण्यासाठी फ्लाइट पकडावी लागली, जिथे त्याला नेदरलँड्सविरुद्ध दुसरा सामना खेळायचा होता. याच कारणामुळे टीम इंडियाने सिडनीमध्ये पाकिस्तानवरचा थरारक विजय साजरा करून एकत्र दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. पण कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या एका मेसेजमुळे टीम इंडियाचा सिडनीतला हा प्लॅन रद्द झाला. रोहित-द्रविड यांनी काय मेसेज दिला? सिडनीत टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष आणि दिवाळी साजरा करण्याचा हा प्लॅन होता. पत्नी आणि मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी खेळाडूंनी सर्व तयारी केली होती. टीम डिनर सिडनी हार्बर इथे होणार होता. पण याचदरम्यान रोहित आणि कोच राहुल द्रविड यांचा मेसेज आला. ‘मिशन अजून पूर्ण झालेलं नाही… विजयाचा आनंद साजरा करण्यात आपण वाहून जाऊ नये.’ या मेसेजमुळे टीम इंडियाची एकत्रित दिवाळी साजरी झाली नाही.
‘पुढच्या सामन्यांवर लक्ष केंद्रित करा!’ राहुल द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षक झाल्यापासून टीमनं रिझल्टपेक्षा प्रोसेसवर जास्त लक्ष द्यायला हवा याकडेच त्यांनी नेहमी भर दिला आहे. जरी तुम्ही पाकिस्तानवर विजय मिळवला असाल तरीही. त्यामुळे टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन रोहितकडून खेळाडूंना पुढच्या सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रोहितच्या मेसेजनंतर पार्टी कॅन्सल भारतीय संघाशी संबंधित सपोर्ट स्टाफच्या एका सदस्यानं एका वृत्तसमूहाला दिलेल्या माहितीनुसार रोहितनं टीम मीटिंगमध्ये सगळ्या खेळाडूंना मोठ्या टार्गेटवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं आहे. ‘टीम इंडियानं चांगली सुरुवात केली आणि आता तीच कामगिरी पुढेही कायम ठेवायची आहे. टी20 वर्ल्ड कप अजून संपलेला नाही. त्यामुळे आम्ही मैदानात राहून आमच्या पुढील सामन्याच्या तयारीवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.’ असं रोहित म्हणाला. हेही वाचा - T20 World Cup: नेदरलँडविरुद्धच्या सामन्यातून टीम इंडियाचा हा खेळाडू होणार आऊट? पाहा कुणाला मिळणार संधी? टीम इंडियाचं पुढचं टार्गेट नेदरलँड दरम्यान भारतीय संघ वर्ल्ड कपच्या सुपर 12 फेरीतील आपला दुसरा सामना नेदरलँडविरुद्ध खेळणार आहे. 27 ऑक्टोबरला हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे.