दिवाळी (Diwali) म्हणजेच दीपावली हा दिव्यांचा, प्रकाशाचा सण आहे. दीपावली सणाला हजारो वर्षांची परंपरा आहे. श्रीराम वनवास संपवून सीतेसह याच काळात अयोध्येत परतले. त्यांच्या स्वागतासाठी म्हणून प्रजेने दीपोत्सव साजरा केला असं मानलं जातं. आश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया या काळात दीपावली साजरी केली जाते. दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे ओळ. दिव्यांची ओळीने केलेली रचना म्हणजेच दिवाळी. दीपावलीच्या काळात घरावर आकाशदिवे-आकाशकंदील लावले जातात. अंगणात, खिडक्या-दरवाज्यांमध्ये पणत्या लावल्या जातात. दाराबाहेर रांगोळ्या काढल्या जातात. चांगल्याची वाईटावर मात याचं प्रतीक म्हणजे दीपावली असं म्हणता