ग्लेन फिलीपचं सुपर कॅच
सिडनी, 22 ऑक्टोबर: सिडनीच्या मैदानात टी20 वर्ल्ड कप च्या आपल्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड संघानं बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही विभागात वर्चस्व गाजवलं. टॉस हरल्यानंतर न्यूझीलंड टीम बॅटिंगसाठी मैदानात उतरली ती एका वेगळ्याच आत्मविश्वासानं. फिन अॅलन, डेवॉन कॉनवेची दमदार खेळी आणि त्यानंतर केन विल्यम्सन, जिमी निशामच्या छोट्याशा योगदानामुळे न्यूझीलंडनं 200 धावांचा डोंगर उभा केला. पण त्यानंतर घरच्या मैदानावर कांगारुंची दाणादाण उडाली. याचदरम्यान किवी संघाच्या ग्लेन फिलीपचं सुपर कॅच पाहायला मिळालं. ग्लेन फिलीपचं सुपर कॅच 201 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ सुरुवातीपासूनच बॅकफूटवर राहिला. वॉर्नर, फिंच, मार्श हे भरवशाचे फलंदाज लवकरच ड्रेसिंग रुममध्ये परतले. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघासमोर चांगलाच दबाव वाढला. याच दबावात अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसनं कव्हर्सच्या वरुन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण हवेत उडालेला स्टॉयनिसचा तो कॅच ग्लेन फिलीपनं सूर मारुन लिलया टिपला.
हेही वाचा - T20 World Cup: गौतम गंभीरनं निवडली पाकिस्तानविरुद्धची प्लेईंग XI, पंत-कार्तिकपैकी कुणाला दिली संधी? खरं तर न्यूझीलंड संघाला त्यांच्या राष्ट्रीय पक्ष्यावरुन ‘किवी’ या नावानंही ओळखलं जातं. हा पक्षी पंख असूनही उडत नाही. पण ग्लेन फिलीप या किवी फिल्डरनं मात्र तब्बल 29 मीटर धावत जाऊन पक्ष्यासारखी उडी मारली आणि अप्रतिम झेल पकडला. फिलिपचं हे कॅच सध्या सोशल मीडियात चांगलच व्हायरल होत आहे. हेही वाचा - T20 World Cup: गौतम गंभीरनं निवडली पाकिस्तानविरुद्धची प्लेईंग XI, पंत-कार्तिकपैकी कुणाला दिली संधी? न्यूझीलंडची विजयी सलामी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरच्या सुपर 12 फेरीच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलियाचा तब्बल 89 धावांनी धुव्वा उडवला. त्यामुळे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पहिल्याच सामन्यात किवी संघानं मोठा धक्का दिला. डेवॉन कॉनवेनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अॅलन (42), कॅप्टन विल्यमसन (23) आणि जिमी निशामसोबत (26*) मोठ्या भागीदाऱ्या केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला 3 बाद 200 धावांचा डोंगर उभारता आला. त्यानंतर 201 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची न्यूझीलंडसमोर दाणादाण उडाली. आणि कांगारुंचा डाव 17.1 ओव्हरमध्येच 111 धावात आटोपला. न्यूझीलंडकडून टिम साऊथी आणि मिचेल सँटनरनं प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्टनं 2 विकेट घेतल्या.