भारत वि. नेदरलँड
सिडनी, 26 ऑक्टोबर: पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर रोहित शर्माची टीम इंडिया आता पुढच्या आव्हानासाठी सज्ज झाली आहे. हे आव्हान आहे नेदरलँडचं. टीम इंडिया समोर ग्रुप 2 मधल्या इतर संघांच्या तुलनेत नेदरलँडचं आव्हान तसं सोपं आहे. त्यामुळे ग्रुपमध्ये अव्वल स्थान भक्कम करण्यासाठी भारतीय संघ नेदरलँडविरुद्ध मोठ्या विजयाच्या अपेक्षेनं मैदानात उतरेल. टीम इंडियाचा टी20 वर्ल्ड कप मधला पहिला सामना मेलबर्नमध्ये झाला होता. पण दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ सिडनीत पोहोचला आहे आणि सिडनीतला हा सामना लवकर सुरु होणार आहे.
कधी आहे भारत - नेदरलँड सामना? टीम इंडिया आणि नेदरलँड संघातला सुपर 12 फेरीतला सामना गुरुवारी 27 ऑक्टोबरला होणार आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना खेळवण्यात येईल. आगामी महत्वाच्या सामन्यांच्या तयारीच्या दृष्टीनं नेदरलँडविरुद्ध भारतीय संघात काही बदल अपेक्षित आहेत. भारतीय वेळेनुसार कधी सुरु होणार सामना? सिडनीतला भारत वि. नेदरलँड सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 12.30 वा. सुरु होईल. तर स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सामना खेळवला जाईल. थेट प्रक्षेपण आणि लाईव्ह स्ट्रीमिंग टी20 वर्ल्ड कपचे सगळे सामने हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर दाखवले जात आहेत. तर डिस्ने हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहायला मिळेल.
हेही वाचा - MS Dhoni: धोनीच्या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला सिनेमा ‘या’ भाषेत, पत्नी साक्षीचाही आहे खास ‘रोल’ भारताचे उर्वरित सामने 27 ऑक्टोबर 2022 भारत वि. नेदरलँड्स, सुपर 12 सिडनी क्रिकेट ग्राऊंड, दुपारी 12.30 वा. 30 ऑक्टोबर 2022 भारत वि. दक्षिण आफ्रिका, सुपर 12 पर्थ स्टेडियम, दुपारी 4.30 वा. 02 नोव्हेंबर 2022 भारत वि. बांगलादेश, सुपर 12 अॅडलेड ओव्हल, दुपारी 1.30 वा., 06 नोव्हेंबर 2022 भारत वि. झिम्बाब्वे, सुपर 12 मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, दुपारी 1.30 वा. हेही वाचा - T20 World Cup: आयर्लंड पुन्हा ठरली जायंट किलर, ‘या’ बलाढ्य टीमला वर्ल्ड कपमध्ये दिला मोठा धक्का भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्विन , हर्षल पटेल, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, अर्शदीप सिंग नेदरलँड संघ - स्कॉट एडवर्ड्स, कॉलिन अॅकरमॅन, शारीझ अहमद, वॅन बीक, टॉम कूपर, ब्रेंडन ग्लोव्हर, वॅन डर गुटेन, फ्रेड क्लासेन, बास डी लीड, पॉल मिकरेन, वॅन डर मर्वे, स्टीफन मायबर्ग, तेजा, मॅक्स ओदाऊद, टीम प्रिंगल, विक्रमजीत सिंग