मेलबर्न, 26 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलियातल्या टी20 वर्ल्ड कप मध्ये धक्कादायक निकालांची मालिका सुरुच आहे. वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच नामिबियानं आशिया कप विजेत्या श्रीलंकेला पराभवाचा धक्का दिला होता. त्यानंतर आयर्लंडनं दोन वेळच्या वर्ल्ड कप विजेत्या वेस्ट इंडिजला हरवलं. याच वेस्ट इंडिजला स्कॉटलंडसारख्या संघाकडूनही हार स्वीकारावी लागली आणि विंडीजचं वर्ल्ड कपमधलं आव्हानही संपुष्टात आलं. सुपर 12 फेरीतही उलटफेर पाहायला मिळाला तो मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर. आज इंग्लंड आणि आयर्लंड या संघात सामना झाला. पण वन डे वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडला हरवणाऱ्या आयर्लंडनं आज मेलबर्न च्या मैदानात पुन्हा एकदा तोच पराक्रम गाजवला. बलाढ्य इंग्लंडला डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंड संघानं 5 धावांनी जिंकला. आयरिश संघाचा पराक्रम 2011 साली भारतात झालेल्या वन डे वर्ल्ड कपमध्ये आयर्लंड संघाची मोठी चर्चा झाली होती. कारण आयर्लंडनं त्यावेळी इंग्लंडनं दिलेलं 300 पेक्षा जास्त धावांचं आव्हान पार केलं होतं आणि एक मोठा इतिहास रचला होता. तोच आयरिश संघ आज पुन्हा एकदा वर्ल्ड कपच्या मैदानात इंग्लंडसमोर आला आणि आजही आयरिश टीमचीच सरशी झाली. या सामन्यात पावसाचा व्यत्यय सुरुच होता. पण तरीही इंग्लंडच्या तगड्या आक्रमणासमोर आयर्लंडनं 157 धावा स्कोअर बोर्डवर लावल्या. कॅप्टन अँडी बलबर्नीच्या 62 धावांच्या खेळीमुळे आयर्लंडला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. इंग्लंडकडून लिविंगस्टन आणि मार्क वूडनं प्रत्येकी 3 तर सॅम करननं 2 विकेट्स घेतल्या.
Incredible scenes after Ireland's win at the MCG 🤩#T20WorldCup | #IREvENG pic.twitter.com/BPRc3j08W8
— ICC (@ICC) October 26, 2022
पण 158 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला सर्वात मोठा धक्का बसला तो बटलरच्या रुपात. पहिल्याच ओव्हरमध्ये जोस बटलर शून्यावर माघारी परतला. त्यानंतर हेल्सही 7 धावा काढून बाद झाला. मग डेव्हिड मलाननं इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण एका बाजूनं इंग्लंडची गळती सुरुच राहिली. त्यात 14.3 ओव्हर्सनंतर पावसाचा जोर चांगलाच वाढला आणि खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी इंग्लंडनं 5 बाद 105 धावा केल्या होत्या.
"They outplayed us in all three facets of the game. The better team won today" ⏤ Jos Buttler on Ireland.#IREvENG | #T20WorldCup pic.twitter.com/7XBJEmUzNY
— The Cricketer (@TheCricketerMag) October 26, 2022
हेही वाचा - T20 World Cup: नेदरलँडविरुद्धच्या सामन्यातून टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू होणार आऊट? पाहा कुणाला मिळणार संधी? डकवर्थ-लुईसचा अवलंब मेलबर्नमध्ये पाऊस थांबत नसल्यानं अंपायर्सनी उर्वरित खेळ रद्द करुन डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंडला विजयी घोषित केलं. कारण ज्यावेळी खेळ थांबला तेव्हा इंग्लंडचा संघ आयर्लंडनं दिलेल्या टार्गेटपेक्षा 5 धावांनी मागे होता. आयर्लंडनं ग्रुप 1 मध्ये 2 सामन्यात 1 विजय आणि एका पराभव स्वीकारला आहे. तर इंग्लंडनं पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानला 5 विकेट्सनी हरवलं होतं.