मुंबई, 25 ऑक्टोबर: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं आपल्या आयुष्यातील नव्या इंनिंगची तयारी सुरु केली आहे. आपल्या 'धोनी एंटरटेन्मेंट' या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली तो लवकरच चित्रपट निर्मितीमध्ये उतरणार आहे. त्याची सुरुवात एका तामिळ चित्रपटाने होणार आहे. 'अथर्व - द ओरिजिन'चे लेखक रमेश थमिलमणी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. धोनीच्या प्रॉडक्शन हाऊसनं हेही जाहीर केलंय की ते देशभरातील अनेक भाषांमध्ये चित्रपट निर्मिती करणार आहेत. तामिळशिवाय धोनीचं प्रोडक्शन हाऊस सस्पेन्स थ्रिलर, क्राईम, विज्ञानकथा आणि इतर अनेक विषयांचे चित्रपट आणणार आहे. त्यासाठी अनेक चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखकांशी सध्या चर्चा सुरु आहे.
Dhoni Entertainment forays into mainstream film production with a Tamil film ✨#dhonientertainment #tamilcinema @SaakshiSRawat @msdhoni @Ramesharchi @PriyanshuChopra @HasijaVikas pic.twitter.com/LIVMkbEvvc
— Dhoni Entertainment Pvt Ltd (@DhoniLtd) October 25, 2022
संकल्पना साक्षी धोनीची
धोनीचं प्रोडक्शन हाऊस जो तामिळ चित्रपट बनवणार आहे त्याची संकल्पना साक्षी धोनीची आहे. हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा असेल. चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांची नावं नंतर जाहीर केली जाणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारलेल्या थमिलमणी यांनी सांगितलंय की, 'या चित्रपटाबाबतची साक्षीची संकल्पना मी वाचली आहे. हे खरोखर विशेष आहे. ही एक पूर्णपणे नवीन संकल्पना आहे आणि या संकल्पनेवर संपूर्ण फॅमिली ड्रामा फिल्म बनण्याची पूर्ण क्षमता आहे.'
तामिळनाडूशी धोनीचं अनोखं नातं
धोनीच्या प्रॉडक्शन हाऊसनं नुकतंच एक निवेदन जारी केलं आहे. प्रॉडक्शन हाऊसनं जारी केलेल्या या निवेदनात म्हटलंय की, 'धोनीचं तामिळनाडूच्या लोकांशी खास नातं आहे. अशा परिस्थितीत तामिळ भाषेत त्याचा पहिला चित्रपट बनवून त्याला हे खास नातं त्याला आणखी घट्ट करायचं आहे.'
तुम्हाला माहितच असेल की चेन्नई सुपर किंग्स या टीमचा धोनी कॅप्टन आहे. त्यानं चेन्नईला आतापर्यंत 4 वेळा विजेतेपद जिंकून दिलं आहे. त्यामुळे तामिळभाषिक आणि तामिळनाडूबद्दल त्याचं विशेष प्रेम आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MS Dhoni, Sakshi dhoni, Sports