रोहित शर्मा झाला भावूक
मेलबर्न, 23 ऑक्टोबर: भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या मैदानात एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा क्रिकेटविश्वातली ती सर्वात मोटी पर्वणी ठरते. आजही मेलबर्नच्या मैदानात हेच दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी टी20 वर्ल्ड कप च्या निमित्तानं समोरासमोर उभे ठाकले. या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आणि त्यानंतर भारतीय संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात आला. पण राष्ट्रगीत संपताच रोहित शर्मा कमालीचा भावूक झाला होता. टेलिव्हिजन कॅमेऱ्यात रोहितच्या चेहऱ्यावरचे हे भाव टिपले गेले आणि सोशल मीडियात रोहितचा हा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले. का झाला रोहित भावूक? रोहित शर्मा गेली 2007 पासून गेल्या प्रत्येक टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळतोय. पण यंदा तो टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. याआधी 2016 पर्यंत महेंद्रसिंग धोनी तर 2021 साली विराट कोहलीनं टीम इंडियाची धुरा सांभाळली होती. पण आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेत पहिल्यांदाच रोहितला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच सामन्याआधी राष्ट्रगीतावेळी जेव्हा रोहित मैदानात उभा होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सगळं काही सांगून जात होते.
गौतम गंभीर म्हणाला… मैदानातल्या या घटनेनंतर समालोचन करताना गौतम गंभीरनं यावर आपली प्रतिक्रिया दिली. गंभीर म्हणाला ’ जेव्हा तुमची इतकी वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता आणि त्यानंतर तुम्हाला वर्ल्ड कपसारख्या स्पर्धेत नेतृत्व करण्याची संधी मिळते त्याच्यासारखा सर्वात मोठा क्षण दुसरा कोणताच नसतो.’ हेही वाचा - T20 World Cup: आशिया चषक विजेत्या संघाची दमदार सुरुवात, आयर्लंडवर मिळवला मोठा विजय टीम इंडियान पाकला 159 धावात रोखलं दरम्यान टीम इंडियानं वर्ल्ड कप मोहिमेतल्या या सलामीच्या सामन्यात दमदार सुरुवात केली. टीम इंडियाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगनं आपला पहिलाच वर्ल्ड कप खेळताना कमाल केली. त्यानं आपल्या पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलवर पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमला शून्यावरच माघारी धाडलं आणि भारताच्या वाटेतला मोठा अडसर दूर केला. त्यानंतर त्यानं भारताला आणखी एक यश मिळवून देताना रिझवानलाही 4 धावांवर बाद केलं. अर्शदीपनं आपल्या 4 ओव्हर्समध्ये 32 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय हार्दिक पंड्यानं 3 तर शमी आणि भुवनेश्वरनं प्रत्येकी एक विकेट घेतली. पाकिस्तानकडून शान मसूद (ना. 52 ) तर इफ्तिकार अहमदनं (51) धावांची खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानला 8 बाद 159 धावांची मजल मारता आली.