जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup: टीम इंडियानं मेलबर्नमध्ये जिंकली अर्धी लढाई, रोहितनं घेतला 'हा' निर्णय

T20 World Cup: टीम इंडियानं मेलबर्नमध्ये जिंकली अर्धी लढाई, रोहितनं घेतला 'हा' निर्णय

भारत वि. पाकिस्तान

भारत वि. पाकिस्तान

T20 World Cup: भारत आणि पाकिस्तान संघात टी20 वर्ल्ड कपच्या मैदानात आज महामुकाबला होतोय. हा सामना जिंकून टीम इंडिया विश्वचषक मोहिमेची विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मेलबर्न, 23 ऑक्टोबर: भारत आणि पाकिस्तान संघात आज क्रिकेटच्या मैदानतला सर्वात मोठा मुकाबला होतोय. मेलबर्नमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तानचा संघ टी20 वर्ल्ड कपच्या मैदानात सुपर 12 फेरीच्या पहिल्या मुकाबल्यासाठी आमनेसामने येत आहेत. महत्वाची बाब म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून अर्धी लढाई जिंकली आहे. त्यानं नाणेफेक जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून मेलबर्नमध्ये पाऊस पडतोय आणि त्याच कारणामुळे या सामन्यावरही अनिश्चिततेचे ढग दाटून आले होते. पण कालपासून मेलबर्नमध्ये पाऊस पडलेला नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आजच्या सामन्यात पूर्ण ओव्हर्सचा खेळ होण्याचा अंदाज आहे.

जाहिरात

महामुकाबल्यासाठी भारतीय संघ - रोहित, राहुल, विराट, सूर्यकुमार, हार्दिक, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, अश्विन, भुवनेश्वर, शमी, अर्शदीप कार्तिकवर विश्वास, शमीचं कमबॅक दरम्यान या सामन्यासाठी रिषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात टीम इंडियाला शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकून देणाऱ्या मोहम्मद शमीला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं आहे.

दोन महिन्यात तिसरी लढत गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान हे क्रिकेटविश्वातले पारंपरिक प्रतिस्पर्धी तिसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान संघात दोन सामने खेळवण्यात आले होते. त्यात दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकला होका.  उभय संघातला वर्ल्ड कपमधील पहिला सामना मेलबर्नमध्ये खेळवला जात आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड हे जगातलं सर्वात मोठं दुसरं क्रिकेट ग्राऊंड. याच ग्राऊंडवर आज जवळपास एक लाख प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सामना खेळवला जातोय. हेही वाचा -  T20 World Cup: धोनीनं ज्याला घडवलं तो गाजवतोय टी20 वर्ल्ड कप, पाहा इंग्लंडचा ‘5 स्टार’ क्रिकेटर टी20त टीम इंडियाचं पारडं जड टी20 क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि पाकिस्ता या दोन संघात आजवर 11 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यात भारतानं 8 वेळा तर 3 वेळा पाकिस्ताननं बाजी मारली आहे. त्यामुळे हे रेकॉर्ड अजून चांगलं करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात