जपानी फुटबॉल चाहते स्टेडियम स्वच्छ करताना
दोहा-कतार, 24 नोव्हेंबर: शिस्त आणि कामाप्रति असलेली आस्था यासाठी जपानी लोक जगात प्रसिद्ध आहेत. जपानी लोक जिथे कुठे जातात तिथे ते लोकांती मनं जिंकल्याशिवाय राहत नाही. असाच प्रत्यय सध्या कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा वर्ल्ड कपदरम्यान आला. बुधवारी जर्मनी आणि जपानमध्ये फिफा वर्ल्ड कपचा साखळी सामना पार पडला. या सामन्यात जपाननं चार वेळा वर्ल्ड कप विजेत्या जर्मनीला पराभवाचा धक्का तर दिलाच पण त्याचबरोबर एका कृतीतून जगाला महत्वाचा संदेशही दिला. खुद्द फिफानंही जपानच्या या कृतीची प्रशंसा केली आहे. जपानी टीमनं काय केलं**?** जपानच्या टीमनं जर्मनीला 2-1 असं हरवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पण सामना संपल्यानंतर त्यांनी ड्रेसिंग रुममध्ये साफसफाई देखील केली. इतकच नव्हे तर अख्खा ड्रेसिंग रुम चकचकीत केला.
हेही वाचा - Ind vs NZ: भारत-न्यूझीलंड वन डे पाहण्यासाठी सकाळी ‘हा’ अलार्म करा सेट… पाहा किती वाजता सुरु होणार मॅच? जपानी फॅन्सनी केलं स्टेडियम साफ जपानी खेळाडूंप्रमाणेच जपानी फॅन्सनी देखील स्टेडियममधला कचरा साफ करत एक नवा आदर्श घालून दिला. जपानच्या विजयानंतर प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये चांगलाच जल्लोष केला. पण त्यानंतर हे प्रेक्षक मैदानात थांबून राहिले. त्यांनी स्टेडियममधला कचरा साफ केला. प्लास्टिक बॉटल, रॅपर आणि झेंडेही उचलले. जपानी फॅन्सच्या या कामाची जगभरातून प्रशंसा होत आहे.
हेही वाचा - Team India: वर्ल्ड कपमधला पराभव जिव्हारी, टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू होतोय रिटायर्ड? Video तून दिले संकेत जपाननं केला मोठा उलटफेर दरम्यान जपाननं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर करताना बलाढ्य जर्मनीला पराभवाचा धक्का दिला. जर्मनीनं या सामन्यात पहिल्या हाफमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या 74 व्या मिनिटापर्यंत जर्मनीनं ही आघाडी टिकवली. पण त्यानंतर अवघ्या 8 मिनिटांच्या फरकानं जपाननं दोन गोल केले आणि एका सनसनाटी विजयाची नोंद केली.