मुंबई, 24 नोव्हेंबर: भारतानं ऑस्ट्रेलियातल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये सेमी फायलची निर्णायक लढत गमावली. टीम इंडियाचं 15 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा धुळीस मिळालं. पण याच पराभवानंतर टीम इंडियाच्या सिनियर खेळाडूंच्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली आहे. काही खेळाडूंसाठी हा शेवटचा वर्ल्ड कप ठरला. याचदरम्यान टीम इंडियाचा अनुभवी विकेट किपर बॅट्समन निवृत्तीच्या घेण्याच्या विचारात असल्याची चर्चा जोर धरतेय. याचं कारण आहे त्यानं सोशल मीडियात शेअर केलेला एक व्हिडीओ. दिनेश कार्तिक रिटायर होतोय? 37 वर्षांचा अनुभवी विकेट किपर बॅट्समन दिनेश कार्तिक यंदाच्या टी20 वर्ल्ड कपचा भाग होता. त्यानं या वर्ल्ड कपमध्ये पाच सामने खेळले. पण टीम इंडियाच्या पराभवानंतर आता कार्तिकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जवळपास संपल्यात जमा आहे. कारण टी20 साठी आता बीसीसीआय जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संधी देण्याच्या विचारात आहे. त्यामुळे कार्तिक फार फार तर आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकेल. याच दरम्यान ऑस्ट्रेलियातून मायदेशी परतल्यानंतर दिनेश कार्तिकनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून त्यानं निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
व्हिडीओ शेअर करताना कार्तिकनं कॅप्शन दिलंय.. ‘भारतासाठी वर्ल्ड खेळण्यासाठी मी बरीच मेहनत घेतली होती. आणि याचा मला अभिमान आहे. वर्ल्ड कपमध्ये आम्ही अंतिम लक्ष्य साध्य करण्यात अपयशी ठरलो. पण या वर्ल्ड कपने मला काही अविस्मरणीय क्षण दिले जे मला कायम लक्षात राहतील.’ हेही वाचा - Ind vs NZ: भारत-न्यूझीलंड वन डे पाहण्यासाठी सकाळी ‘हा’ अलार्म करा सेट… पाहा किती वाजता सुरु होणार मॅच? व्हिडीओत खेळाडूंसह कुटुंबीय शेअर केलेल्या व्हिडीओक कार्तिक सहकारी खेळाडूंसह आपल्या कुटुंबीयांसोबतही दिसत आहे. या व्हिडीओत कार्तिकचे आई-वडील, पत्नी आणि मुलंही आहेत. त्यामुळे तो काहीतरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. हेही वाचा - IPL 2023: बीसीसीआयनं IPL रजिस्ट्रेशनसाठी दिली डेडलाईन, हे दिग्गज खेळाडूही उतरणार लिलावात कार्तिकचं करिअर दिनेश कार्तिकनं भारतासाठी 180 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3463 धावा केल्या आहेत. त्यात 26 कसोटी, 94 वन डे आणि 60 टी20 सामन्यांचा समावेश आहे.