जगातला सर्वांत भव्य क्रीडासोहळा हे बिरुद मिरवणारा ‘फिफा फुटबॉल वर्ल्ड कप’ (World Cup) दर चार वर्षांनी आयोजित करण्यात येतो. 1930 पासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असून, 32 टीम्समध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येते.
फुटबॉल (Football) हा प्रामुख्याने क्लब आणि लीग स्तरावर खेळला जाणारा क्रीडाप्रकार आहे. क्लब फुटबॉलमध्ये विविध देशांचे खेळाडू एकाच टीमकडून खेळताना दिसतात. 1904 मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाची (फिफा) (FIFA) स्थापना झाल्यानंतर फुटबॉलच्या प्रसाराच्या दृष्टीने फुटबॉल खेळणाऱ्या देशांच्या राष्ट्री