जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ind vs NZ: भारत-न्यूझीलंड वन डे पाहण्यासाठी सकाळी 'हा' अलार्म करा सेट... पाहा किती वाजता सुरु होणार मॅच?

Ind vs NZ: भारत-न्यूझीलंड वन डे पाहण्यासाठी सकाळी 'हा' अलार्म करा सेट... पाहा किती वाजता सुरु होणार मॅच?

भारत आणि न्यूझीलंड वन डे

भारत आणि न्यूझीलंड वन डे

Ind vs NZ: भारत आणि न्यूझीलंडच्या प्रमाणवेळेत बराच फरक असल्यानं वन डे सामना भारतीय वेळेनुसार सकाळी सुरु होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना सकाळी लवकर उठावं लागणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

ऑकलंड, 24 नोव्हेंबर: न्यूझीलंड दौऱ्यातल्या टी20 मालिकेनंतर टीम इंडिया सज्ज झाली आहे ती वन डे मालिकेसाठी. शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघ यजमान न्यूझीलंडशी दोन हात करणार आहे. तीन सामन्याच्या या मालिकेतील पहिला सामना ऑकलंडमध्ये होणार आहे. पण भारत आणि न्यूझीलंडच्या प्रमाणवेळेत बराच फरक असल्यानं वन डे सामना भारतीय वेळेनुसार सकाळी सुरु होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना सकाळी लवकर उठावं लागणार आहे. कधी सुरु होणार मॅच? भारत आणि न्यूझीलंड संघातला वन डे सामना शुक्रवारी सकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. तर टॉस 6.30 वाजता होईल. त्यामुळे जर मॅचचा एकही बॉल चुकवायचा नसेल तर तुम्हाला सकाळी लवकरचा अलार्म सेट करावा लागेल.

जाहिरात

वन डे ट्रॉफीचं अनावरण दरम्यान आज ऑकलंडमध्ये टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन आणि केन विल्यमसननं या वन डे मालिकेच्या ट्रॉफीचं अनावरण केलं. यावेळी दोन्ही कर्णधारांचं ट्रॉफीसह फोटोशूट पार पडलं.

हेही वाचा -  FIFA WC 2022: फिफा वर्ल्ड कपमध्ये जपानची ‘त्सुनामी’, ‘या’ बलाढ्य संघाला दिला पराभवाचा तडाखा भारत-न्यूझीलंड वन डे मालिका 25 नोव्हेंबर, पहिली वन डे - ऑकलंड 27 नोव्हेंबर, दुसरी वन डे - हॅमिल्टन 30 नोव्हेंबर, तिसरी वन डे - ख्राईस्टचर्च वन डे मालिकेतले तिन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी सात वाजता सुरु होणार आहेत. भारताचा वन डे संघ -  शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, कुलदीप सेन, अर्शदीप,  शार्दूल ठाकूर, दीपक चहर.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात