JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ind vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात पाऊस? पाहा रविवारच्या मॅचआधी Weather Report

Ind vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात पाऊस? पाहा रविवारच्या मॅचआधी Weather Report

Ind vs SA: या मॅचआधी एक चांगली बातमी आहे. Accuweather या हवामानाविषयी माहिती देणाऱ्या संस्थेच्या माहितीनुसार पर्थमध्ये रविवारी पावसाची शक्यता केवळ 2 टक्के इतकी आहे.

जाहिरात

पर्थ स्टेडियम

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पर्थ, 29 ऑक्टोबर: यंदाच्या टी20 वर्ल्ड कप मध्ये पावसानं मोठा गोंधळ घातला आहे. पावसामुळे अनेक सामने आतापर्यंत रद्द करावे लागले आहेत. त्यात पुढच्या काही सामन्यांवरही पावसाचं सावट कायम आहे. मेलबर्नमध्ये तर 5 पैकी 3 सामने पावसामुळे वाया गेले. त्यामुळे पाऊस अनेक संघांसाठी चिंतेचं कारण ठरला आहे. दरम्यान रविवारी  भारत आणि दक्षिण आफ्रिका  संघांमध्ये सुपर 12 फेरीतला महत्वाचा सामना होणार आहे. हा सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर खेळवण्यात येईल. पण त्याआधी जाणून घेऊयात पर्थमध्ये कसं असेल उद्याचं वातावरण? पर्थमध्ये पावसाची शक्यता कमी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातला सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजाता सुरु होईल. पण या मॅचआधी एक चांगली बातमी आहे. Accuweather या हवामानाविषयी माहिती देणाऱ्या संस्थेच्या माहितीनुसार पर्थमध्ये रविवारी पावसाची शक्यता केवळ 2 टक्के इतकी आहे. सकाळच्या सत्रात पाऊस पडण्याचा अंदाज आहे पण त्यानंतर दिवसभर आकाश स्वच्छ राहील. तर कमाल तापमान 18 अंश सेल्सिअस असं असेल. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पर्थमध्ये पूर्ण सामना पाहायला मिळेल आणि या सामन्यात पावसाचा जराही व्यत्यय येणार नाही अशी शक्यता आहे. हेही वाचा -  T20 World Cup: बांगलादेशला विकेट किपरची हुशारी पडली भारी, दक्षिण आफ्रिकेला 5 पेनल्टी रन्स, पाहा काय घडलं? पर्थमध्ये रविवारी हवामानाचा अंदाज  कमाल तापमान - 18 अंश से. किमान तापमान - 7 अंश से. हवेची गती - 55 किमी/तास पावसाची शक्यता - 2 टक्के पिच रिपोर्ट पर्थमधल्या खेळपट्टीचा विचार करता इथे वेगवान गोलंदाजांचं वर्चस्व असतं. पण गेल्या सामन्यात पाकिस्तानचा शादाब खान आणि झिम्बाब्वेच्या सिकंदर रझानं कमाल केली केली होती. इतकच नव्हे तर कमी धावसंख्येच्या सामन्यात झिम्बाब्वेनं पाकिस्तानचा अवघ्या एका धावेनं पराभव केला होता. त्यामुळे भारतीय फलंदाजांना उद्याच्या सामन्यात जपून खेळावं लागेल. हेही वाचा -  T20 World Cup: झिम्बाब्वे क्रिकेटचं नशीब बदलणारं भारतीय नाव, पाहा बदलत्या झिम्बाब्वेची संपूर्ण कहाणी टीम इंडिया टॉपवर भारतीय संघानं याआधी पाकिस्तान आणि नेदरलँडचा पराभव करुन पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे. उद्याचा सामना जिंकल्यास टीम इंडियाचं सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म होणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला हरवून यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये विजयाची हॅट्ट्रिक नोंदवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल. भारत वि. दक्षिण आफ्रिका सुपर 12, ग्रुप 1 मॅच ऑप्टस स्टेडियम, पर्थ संध्याकाळी 4.30 वा. थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स, डिस्ने हॉट स्टारवर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या