पर्थ, 29 ऑक्टोबर: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातला टी20 वर्ल्ड कप च्या सुपर 12 फेरीतला सामना रविवारी पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ शुक्रवारी पर्थमध्ये दाखल झाला. पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्धचे पहिले दोन सामने जिंकून टीम इंडिया पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना भारतीय संघाच्या दृष्टीनं महत्वाचा ठरणार आहे. पण या सामन्यात पाकिस्तानी संघ मात्र भारताच्या बाजूनं असणार आहे. आणि याचं महत्वाचं कारण आहे सेमी फायनलचं गणित. पाकिस्तान अजूनही शून्यावरच आधी भारत आणि त्यानंतर झिम्बाब्वेनं पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे पाकिस्तानला सेमी फायनलचं तिकिट मिळणं मुश्किल झालंय. पॉईंट टेबलमध्ये पाकिस्तानी संघानं अजूनही खातं खोललेलं नाही. पण तरीही पाकिस्तानला सेमी फायनल गाठण्याची संधी आहे. पण त्यासाठी पाकिस्तानला भारतावरही अवलंबून राहावं लागणार आहे. हेही वाचा - T20 World Cup: झिम्बाब्वे क्रिकेटचं नशीब बदलणारं भारतीय नाव, पाहा बदलत्या झिम्बाब्वेची संपूर्ण कहाणी पाकिस्तानला कसं मिळू शकतं सेमी फायनलचं तिकीट? सुपर 12 फेरीत पाकिस्तानचा संघ ग्रुप 2 मध्ये आहे. या गटात भारत आणि दक्षिण आफ्रिका सध्या सेमी फायनलसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पण पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना स्वत:च्या कामगिरीसह प्रामुख्यानं भारताच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल. पण पाकिस्तानचा सेमी फायनलचा मार्ग कसा आहे तेही पाहा… पाकिस्तानला सेमी फायनल गाठायची असेल तर… - भारतानं दक्षिण आफ्रिकेला हरवावं लागेल - पाकिस्तानला उर्वरित तिन्ही सामन्यात जिंकावं लागेल
पर्थमध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी पर्थच्या मैदानात रविवारी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. हे तेच मैदान आहे जिथे पाकिस्तानला झिम्बाब्वेकडून एका धावेनं पराभव स्वीकारावा लागला होता. रविवारी संध्याकाळी 4.30 वाजता हा सामना सुरु होईल. या सामन्यात टीम इंडिया जिंकली तर पाकिस्तानचं स्पर्धेतलं आव्हान जिवंत राहील. पण टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला तर मात्र पाकिस्तानच्या उरल्यासुरल्या आशा जवळपास संपुष्टात येतील. त्यामुळे पाकिस्तानी संघ रविवारच्या सामन्यात भारत जिंकावा यासाठी प्रार्थना करेल.