JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND VS NZ : श्रीलंके प्रमाणे टीम इंडिया न्यूझीलंडवरही पडणार भारी? कधी, कुठे पहाल सामना?

IND VS NZ : श्रीलंके प्रमाणे टीम इंडिया न्यूझीलंडवरही पडणार भारी? कधी, कुठे पहाल सामना?

न्यूझीलंड हा सध्या नंबर आयसीसीच्या वनडे रँकिंग मध्ये प्रथम स्थानी आहे, त्यामुळे ही मालिका जिंकणं भारतासाठी सोपं नसेल. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धचा सामना हा अतितटीचा होणार असून यात कोण बाजी मारत हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जानेवारी : श्रीलंकेला वनडे सामन्यात व्हाईट वॉश दिल्यानंतर आता भारतीय संघ न्यूझीलंडशी भिडणार आहे. न्यूझीलंड संघ सध्या भारत दौऱ्यावर आलेला असून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका आणि तीन सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येईल. यापैकी वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे.  न्यूझीलंड हा सध्या नंबर आयसीसीच्या वनडे रँकिंग मध्ये प्रथम स्थानी आहे, त्यामुळे ही मालिका जिंकणं भारतासाठी सोपं नसेल. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धचा सामना हा अतितटीचा होणार असून यात कोण बाजी मारत हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. भारतीय संघा प्रमाणेच न्यूझीलंड संघाने देखील नुकतेच वनडे मालिकेत पाकिस्तानला नमवले आहे. त्यामुळे दोन्हीही संघ वाढलेल्या आत्मविश्वासाने पुढील वनडे मालिकेला सामोरे जातील. वनडे मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व हे कर्णधार रोहित शर्मा याच्याकडे असणार असून संघात विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल इत्यादी स्टार खेळाडूंचा समावेश असेल.  के एल राहुल त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे न्यूझीलंड मालिकेतून बाहेर असेल तर श्रेयस अय्यर याला देखील पाठीच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. श्रेयस ऐवजी संघात रजत पाटीदार याला संधी देण्यात आली आहे. हे ही पहा  : भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेत रजत पाटीदारला मिळाली संधी कधी होणार सामान : आज 18 जानेवारी रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेतील पहिला सामना हैद्राबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर होणार आहे. आज दुपारी 1:30 वाजता सामन्याला सुरुवात होणार असून त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होईल. कुठे पहाल सामना : न्यूझीलंड विरुद्धचा वनडे सामन्याचे प्रक्षेपण हे स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर होणार असून डिझनी हॉट्स स्टार अँपवर देखील याचे लाईव्ह प्रक्षेपण लोकांना पाहता येईल. तसेच डीडी स्पोर्ट्सवर हा सामना प्रेक्षकांना फ्री पाहता येणार आहे. हे ही पहा  : चक्क आयसीसीनं केली मोठी गडबड! अवघ्या 2 तासासाठी टीम इंडिया बनली टेस्ट नंबर वन; पण त्यानंतर… वनडे मालिकेसाठी संघ भारतीय संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक न्यूझीलंड संघ : टॉम लॅथम, फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, हेन्री शिपले, ईश सोधी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या