जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेत रजत पाटीदारला मिळाली संधी

भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेत रजत पाटीदारला मिळाली संधी

भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेत रजत पाटीदारला मिळाली संधी

रजत पाटीदार हा देशांतर्गत सामन्यांमध्ये मध्य प्रदेशकडून खेळतो. त्याने ऑक्टोबर 2015 मध्ये प्रथम श्रेणी पदार्पण सामना खेळला. यानंतर त्याने डिसेंबर 2015 मध्ये लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याची कामगिरी देखील चांगली राहिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, १७ जानेवारी : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 18 जानेवारीपासून वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. परंतु या मालिकेपूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. स्टार फलंदाज श्रेयस अय्यर हा पाठीच्या दुखापतीमुळे मालिकेबाहेर पडला. परंतु श्रेयसच्या जागी बीसीसीआयने युवा फलंदाज रजत पाटीदार याला संघात संधी दिली आहे. रजत पाटीदारने यापूर्वी आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केली असून तो भारताच्या ‘अ’ संघाकडूनही खेळला आहे. रजत पाटीदार हा देशांतर्गत सामन्यांमध्ये मध्य प्रदेशकडून खेळतो. त्याने ऑक्टोबर 2015 मध्ये प्रथम श्रेणी पदार्पण सामना खेळला. यानंतर त्याने डिसेंबर 2015 मध्ये लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याची कामगिरी देखील चांगली राहिली आहे. रजतने गेल्या 7 सामन्यात सलग अर्धशतकं झळकावली आहेत. यादरम्यान त्याने शतकही झळकावलं. तो मध्य प्रदेशच्या अंडर-19 आणि अंडर-22 संघांसाठीही खेळला आहे. रजत आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतो. आयपीएल 2022 मध्येही त्याने महत्त्वाची खेळी केल्याचं दिसून आले होते. तेव्हा रजत आता भारतीय संघाकडून खेळताना कशी कामगिरी करतो याकडे लक्ष राहील.

जाहिरात

भारताचा न्यूझीलंड विरुद्ध  एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार)वॉशिंगट सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराद, उमरान मलिक

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात