JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup: टीम इंडिया 17 दिवस आधी ऑस्ट्रेलियात का पोहोचली? हार्दिक पंड्यानं केला खुलासा

T20 World Cup: टीम इंडिया 17 दिवस आधी ऑस्ट्रेलियात का पोहोचली? हार्दिक पंड्यानं केला खुलासा

T20 World Cup: बीसीसीआयनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात हार्दिक पंड्यानं टीमच्या तयारीपासून ऑस्ट्रेलियात पोहोचण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा उलगडा केलाय.

जाहिरात

हार्दिक पंड्या

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ब्रिस्बेन, 17 ऑक्टोबर:  टी20 वर्ल्ड कप आधी पहिल्याच सराव सामन्यात टीम इंडियानं यजमान ऑस्ट्रेलियावर मात केली. टीम इंडियासाठी आगामी लढतींच्या दृष्टीनं हा विजय महत्वाचा आहे. सुपर 12 फेरीत भारताचा पहिला सामना होणार आहे तो पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी. 23 ऑक्टोबरला होणाऱ्या या लढतीआधी बुधवारी भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध आणखी एक सराव सामना खेळणार आहे. गेल्या 15 वर्षांपासून टीम इंडियाला दुसऱ्या टी20 विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. त्यासाठी रोहित शर्मा अँड कंपनी ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. पण विश्वचषक मोहिमेच्या तब्बल 17 दिवस आधी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात का पोहोचला होता. पण इतक्या लवकर टीम इंडिया ऑस्ट्रेलियात का आली असा प्रश्न अनेकांना पडला. हार्दिक पंड्यानं दिलं उत्तर बीसीसीआयनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात हार्दिक पंड्यानं टीमच्या तयारीपासून ऑस्ट्रेलियात पोहोचण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा उलगडा केलाय. हार्दिकनं या व्हिडीओत म्हटलंय की ‘आम्ही वर्ल्ड कपच्या 17 दिवस आधीच ऑस्ट्रेलियात दाखल झालो. त्याचं कारण हे की इथल्या वातावरणाची आम्हाला सवय व्हावी. त्यासाठी आम्ही बीसीसीआयचे आभारी आहोत. तुम्ही गोलंदाज असो वा फलंदाज, तुम्ही एकाद्या ठिकाणी जितका जास्त वेळ घालवता तितका तुम्हाला खेळताना फायदा होतो.’

संबंधित बातम्या

बॅटिंगविषयी काय म्हणाला हार्दिक? दरम्यान आपल्या फलंदाजीविषयी बोलताना हार्दिक म्हणाला की तो समाधानी आहे. ‘जेव्हा तुम्ही 20 बॉल खेळून इनिंग पुढे नेता तेव्हा तुमचं मनोबल उंचावतं. जितका वेळ तुम्ही क्रीझवर घालवता तितका तुमचा आत्मविश्वास वाढतो.’ हेही वाचा -  T20 World Cup: विराटसोबत दिसणारी ही मुलगी कोण? सोशल मीडियात फोटो Viral बुधवारी दुसरा सराव सामना दरम्यान टीम इंडिया आपला दुसरा सराव सामना बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. आज झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला. त्यामुळे विश्वचषक मोहिमेत टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. या सामन्यात हार्दिकनं फारशी कमाल दाखवली नसली तरी सूर्यकुमार यादव आणि लोकेश राहुलनं दमदार अर्धशतकं झळकावली. त्यानंतर मोहम्मद शमीनं शेवटच्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेऊन दमदार कमबॅक केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या