ब्रिस्बेन, 16 ऑक्टोबर: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातला सराव सामना रोमांचक झाला. पण अखेरच्या क्षणी रोहित शर्मानं घेतलेला महत्वाचा निर्णय टीम इंडियाच्या पथ्थ्यावर पडला. त्यामुळे टीम इंडिया नं हा सामना 6 धावांनी जिंकून वर्ल्ड कप मोहिमेची दमदार सुरुवात केली. या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं होतं. पण अॅरॉन फिंचच्या दमदार अर्धशतकामुळे टीम इंडियाच्या हातून हा सामना निसटतो की काय अशी परिस्थिती होती. पण अखेरच्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमी नं गेम चेंजर ठरला. त्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचे 4 बॅट्समन आऊट झाले. त्यामुळे भारतानं कांगारुंना 180 धावातच रोखलं. रोहितचा स्मार्ट गेम, शमीला दिली ओव्हर ऑस्ट्रेलियाला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 11 धावा हव्या होत्या. त्यावेळी रोहितनं एक वेगळा डाव खेळला. प्रॅक्टिस मॅच असल्यानं 15 सदस्यीय संघातील कोणत्याही खेळाडूला मैदानात उतरवण्याची मुभा होती. त्यामुळे रोहितनं गेल्या आयपीएलपासून एकही टी20 सामना न खेळलेल्या शमीला मैदानात उतरवलं. आणि शेवटच्या ओव्हरसाठी रोहितनं त्याच्या हाती बॉल सोपवला. शमीनं कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवताना पहिल्या दोन बॉलमध्ये 4 धावा दिल्या. पण त्यानंतर पुढच्या 4 बॉलवर ऑस्ट्रेलियाचे 4 बॅट्समन माघारी परतले आणि टीम इंडियानं हा सामना 6 धावांनी खिशात घातला. शेवटच्या ओव्हरमध्ये शमीनं 4 धावा देत 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
त्याआधी फिंचनं 76 धावांची खेळी करुन ऑस्ट्रेलियाला विजयाच्या जवळ आणून ठेवलं होतं. पण 19व्या ओव्हरमध्ये फिंच आऊट झाला. शमीचं जबरदस्त कमबॅक आयपीएलच्या फायनलमध्ये मोहम्मद शमी शेवटचा टी20 सामना खेळला होता. पण त्यानंतर आज तब्बल 5 महिन्यांनी शमीनं टी20 सामन्यात बॉलिंग केली. आणि त्यातही त्यानं जबरदस्त प्रदर्शन केलं. दरम्यान शमी हा टीम इंडियाच्या टी20 वर्ल्ड कप संघात स्टँड बाय खेळाडूंच्या यादीत होता. पण ऐनवेळी बुमराला दुखापत झाली आणि त्याच्या जागी 15 सदस्यीय संघात शमीची वर्णी लागली.
What A Win! 👌 👌#TeamIndia beat Australia by 6⃣ runs in the warm-up game! 👏 👏
— BCCI (@BCCI) October 17, 2022
Scorecard ▶️ https://t.co/3dEaIjgRPS #T20WorldCup | #INDvAUS pic.twitter.com/yqohLzZuf2
भारताची दमदार फलंदाजी भारतीय संघानं लोकेश राहुल आणि सूर्यकुमारच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 186 धावा स्कोअर बोर्डवर लावल्या. टीम इंडियाचा उपकर्णधार आणि सलामीवीर लोकेश राहुलनं भारतीय संघाला दमदार सुरुवात करुन दिली. राहुलनं कॅप्टन रोहित शर्मासह पहिल्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली. त्यात राहुलचा वाटा होता 33 बॉलमध्ये 57 धावांचा. त्यात त्यानं 6 फोर आणि 3 सिक्सर्स ठोकले. राहुलनं आपलं अर्धशतक 27 बॉल्समध्ये पूर्ण केलं.
Fifties from KL Rahul and Suryakumar Yadav help India post a total of 186/7 👏#AUSvIND | Scorecard: https://t.co/XYhp7ckaK6 pic.twitter.com/Np44CdZj7m
— ICC (@ICC) October 17, 2022
हेही वाचा - T20 World Cup: 10 रन्सच्या आत 8 बॅट्समन आऊट, वर्ल्ड कपआधीच ‘या’ टीमची झाली अशी अवस्था राहुलनंतर फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवनंही गॅबाच्या मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. आशिया कपपासून सूर्याच्या बॅटमधून सुरु असलेला धावांचा ओघ कायम आहे. सूर्यानं कांगारुंविरुद्धच्या या सामन्यातही आणखी एक अर्धशतकी खेळी केली. त्यानं 33 बॉल्समध्ये 6 फोर आणि एका सिक्ससह 50 धावा फटकावल्या. सूर्यासह कॅप्टन रोहितनं 15, विराटनं 19 तर दिनेश कार्तिकनं 20 धावा केल्या. पण हार्दिक पंड्या अवघ्या 2 धावा काढून माघारी परतला.