JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / प्रेमात सहसा अयशस्वी होतात या राशी, रिलेशनशिपवरून कायम असतात संभ्रमात

प्रेमात सहसा अयशस्वी होतात या राशी, रिलेशनशिपवरून कायम असतात संभ्रमात

काहींना नातेसंबंधांमध्ये पाळण्याचे मूलभूत शिष्टाचार माहिती नसतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 मे: प्रेमात सगळेच शहाणे आणि परिपक्व नसतात. काहींना नातेसंबंधांमध्ये पाळण्याचे मूलभूत शिष्टाचार माहिती नसतात. ते केवळ अनभिज्ञ नसतात, तर रिलेशनमध्ये असताना त्यांनी काय करावे याबद्दल त्यांना कल्पना नसते. हे लोक त्यांच्या चुका लक्षात न घेता ते लव्ह लाइफ नष्ट करतात. ज्योतिष शास्त्रामुळे बारा राशींचे विश्लेषण करून लोकांच्या व्यक्तिमत्त्वातील गुंतागुंत समजून घेणे सोपे होते. म्हणून, येथे राशीचक्रातील अशा राशींची येथे माहिती देत आहोत, जे प्रेम आणि रिलेशनबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असण्याची शक्यता आहे.

कन्या सर्वकाही परिपूर्णतेच्या अधीन करण्याच्या प्रयत्नात, ते त्यांची लव्ह लाइफ गमावतात. त्यांच्या जोडीदाराला या क्षणी त्यांची गरज आहे की नाही हे त्यांना समजू शकत नाही. जेव्हा नातेसंबंधांचा विचार केला जातो, तेव्हा ते अज्ञानी असतात कारण ते अगदी लहान तपशिलांवर टीका करतात. हिंदू धर्मातील देवी-देवतांची संख्या किती? काय आहे 33 कोटी मान्यतेमागचा अर्थ! मिथुन त्यांच्यासाठी हे खूप असामान्य आहे, परंतु त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून काय हवे आहे, याबद्दल ते पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. ते सर्व काही एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करतात आणि हीच त्यांची मोठी चूक आहे. त्यांच्या जोडीदाराला त्यांच्याकडून नेमके काय हवे आहे, हे समजण्यात त्यांना अडचण येते. तूळ सगळं काही परफेक्ट असण्याच्या नादात यांना खरे प्रेम लक्षात येत नाही. यामुळे लव्ह लाइफवर वाईट परिणाम होतो. त्यांना जोडीदारांच्या गरजांबद्दल अज्ञान असते, यामुळे ते योग्य प्रतिसाद देऊ शकत नाहीत. रिलेशनशिपबद्दल म्हणाल तर त्यांना ती हवी आहे, पण स्वत:च्याच अटींवर. जोडीदाराच्या लहानसहान चुकांवर टीका करण्याची सवय त्यांना अडचणीत आणू शकते. मेष राशीत चंद्राच्या प्रवेशाने तयार झाला चतुर्ग्रही योग, या राशींचे उजळणार भाग्य धनु त्यांच्यात स्वातंत्र्याची तीव्र भावना आहे, जी दूर करणे कठीण आहे. एकट्याने प्रवास आणि साहसाबद्दलचे त्यांचे प्रेम त्यांच्या जोडीदाराला त्रास देते आणि त्यांना हेच नेमके कळत नाही. ते त्यांच्या जोडीदाराच्या भावनांबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असतात आणि ते कधीकधी त्यांच्या जोडीदाराला न सांगता भटकायला निघून जातात. कुंभ समोरच्या व्यक्तीला काय वाटते हे समजण्यासाठी ते स्वतःच्या जीवनात खूप गुंतलेले असतात. त्यांच्यासाठी नातेसंबंधात असणे खूप कठीण आहे, कारण ते सर्व त्यांच्या स्वतःच्या सर्जनशील जगाबद्दल आणि कल्पनाशक्तीत डुंबलेले राहतात. त्यांना एकटे राहायला आवडते. प्रेमाच्या बाबतीत या राशी आहेत परिपक्व विचारांच्या मेष, वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर आणि मीन प्रेमाच्या बाबतीत खूप परिपक्व आहेत. कोणत्याही महत्त्वाच्या परिस्थितीत ते आपल्या जोडीदाराच्या भावनांचा सर्वात आधी विचार करतात. यामुळे यांचे प्रेमजीवनदेखील मधुर असते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या