JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / मंदिराच्या पायऱ्यांवर बसून केवळ 'हा' श्लोक म्हणा; मिळेल प्रचंड मनःशांती

मंदिराच्या पायऱ्यांवर बसून केवळ 'हा' श्लोक म्हणा; मिळेल प्रचंड मनःशांती

मंदिराचा कळस म्हणजेच देवाचं मुख आणि पायऱ्या म्हणजेच देवाचे चरण मानले जातात. त्यामुळे देवाच्या चरणात बसून भाविक आपल्या मनातील इच्छा देवाला सांगत असतात.

जाहिरात

हे परमेश्वरा, मला कोणाच्या आसऱ्याची गरज पडू देऊ नको. मला कोणावरही अवलंबून राहू देऊ नको.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी अयोध्या, 16 जून : हिंदू धर्मात देवपूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे अनेकजण दररोज मंदिरात जाऊन पूजा करतात. आपण पाहिलं असेल तर बरेचजण मंदिरातून बाहेर आल्यावर मंदिराच्या पायऱ्यांवर बसून नामस्मरण करत असतात. असं केल्याने मनातील इच्छा निश्चितपणे पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे अशावेळी नेमकं कोणतं नामस्मरण करावं हे आज आपण जाणून घेणार आहोत. खरंतर, हिंदू धर्मात संपूर्ण मंदिरालाच देवाचं रूप मानलं जातं. मंदिराचा कळस म्हणजेच देवाचं मुख आणि पायऱ्या म्हणजेच देवाचे चरण मानले जातात. त्यामुळे देवाच्या चरणात बसून भाविक आपल्या मनातील इच्छा देवाला सांगत असतात.

उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील प्रसिद्ध कथाकार पवनदास शास्त्री सांगतात की, मंदिराच्या पायऱ्यांवर बसणं हे धार्मिक शास्त्रात अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे आपल्या आयुष्यातील समस्या हळूहळू दूर होतात. मंदिराच्या पायऱ्यांवर बसून मनाशी ‘!! अनायासेन मरणम्, बिना देन्येन जीवनम्। देहान्त तव सानिध्यम्, देहि मे परमेश्वरम्!!’ या श्लोकाचा जप करावा असं त्यांनी सांगितलं. आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या 15 वास्तू टिप्स, गृह क्लेशातून होईल मुक्ती या ओळींचा अर्थ असा की, ‘हे परमेश्वरा, मला सुखाचं मरण दे. माझ्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये, कोणालाही माझी अडचण होऊ नये. जीवाला भीषण वेदना, अस्वस्थता नको. चालते-फिरते मरण येऊदे. मला कोणाच्या आसऱ्याची गरज पडू देऊ नको. मला कोणावरही अवलंबून राहू देऊ नको. जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर तुझाच चेहरा येऊदे.’ हा जप केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन आपल्याला मनःशांती प्राप्त होते आणि शांततेचं जीवन जगता येतं, असं पवनदास शास्त्री यांनी सांगितलं. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या