मुंबई, 16 जून: मुंबई घरात विनाकारण तणाव आणि वाद झाल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. यामुळे, परस्पर संबंधांमध्ये कटुता आणि एकमेकांबद्दल उदासीनता येते. तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंद हवा असेल आणि नात्यातील कटुता दूर करायची असेल, तर तुमच्यासाठी हे 15 सोपे वास्तू उपाय आहेत, जे फॉलो करून तुम्ही अनेक समस्यांतून सुटका करू शकता. बेडरूम आणि किचनमध्ये केलेल्या या चुका देतात गरिबीला आमंत्रण 1. आठवड्यातून एकदा गुग्गुळाचा धूर तुमच्या घरात दाखवावा. हे शुभ मानले जाते. 2. गव्हात नागकेशरचे 2 दाणे आणि तुळशीची 11 पाने घालून दळून आणा. हे शुभ मानले जाते. 3. घरामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लवंगाने लावणे शुभ मानले जाते. 4. दर गुरुवारी घरातील तुळशीच्या रोपाला दूध अर्पण करणे शुभ मानले जाते. 5. तव्यावर पोळी भाजण्यापूर्वी दूध शिंपडणे शुभ आहे. 6. लक्षात ठेवा, गाईसाठी पहिली पोळी काढणे शुभ मानले जाते. 7. नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या घरात एकाच ओळीत 3 दरवाजे नसावेत. Vastu Tips In Marathi: आठवड्यातील दोन दिवस अगरबत्ती लावण्यास आहेत वर्ज्य 8. सुकी फुले अर्थात निर्माल्य घरात कधीही ठेवू नका. ९. संत आणि महात्म्यांची चित्रे आशीर्वादाच्या मुद्रेत घरी ठेवा. 10. घरात तुटलेल्या-फुटलेल्या वस्तू, जुनाट रद्दी आणि अनावश्यक वस्तू कधीही ठेवू नका. यामुळे नकारात्कता येते. 11. लक्षात ठेवा, घरात गळणारे नळ नसावेत. Mithun Sankranti 2023 : आज मिथुन संक्रांतीच्या दिवशी करा हे 5 उपाय, आयुष्यातील सर्व समस्या होतील दूर 12. तुमच्या घरात गोलाकार कडा असलेले फर्निचर शुभ असते. 13. तुळशीचे रोप घरामध्ये पूर्व दिशेला किंवा पूजास्थानाजवळ ठेवा. 14. वास्तूनुसार पाण्याचा निचरा उत्तर किंवा पूर्व दिशेला करणे आर्थिक दृष्टीने शुभ असते. 15. घराच्या आग्नेय कोपर्यात हिरवळीचे चित्र लावा. हे अत्यंत शुभ असते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.