पुणे, 6 डिसेंबर: पुण्यात (Pune) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाढदिवसाच्या पार्टीत (Birthday Party) चक्क महिलेसमोर तीन जणांनी अंगावरील कपडे काढून विवस्त्र अवस्थेत डान्स केल्याचं समोर आलं आहे. सांळुके विहारमधील ग्राफीकॉन सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये (Kondhawa Police Station) महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांपैकी एकाला अटक केल्याचं समजते. हेही वाचा… आताशी कुठे झाली होती नवदाम्पत्याच्या आयुष्याची सुरूवात, क्षुल्लक वादानं केला घात या प्रकरणी पीडित महिलेनं कोंढवा पोलिसांत घाव घेऊन रितसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून राज उर्फ कैलास महेश गणात्रा (वय-47) याला अटक केली आहे. आरोपीचे साधीदार अमोर कंडई आणि सिद्धार्थ शेट्टी हे दोघे फरार आहेत. काय आहे प्रकरण? मिळालेली माहिती अशी की, पीडित महिला 37 वर्षाची आहे. तिन्ही आरोपी तिच्या परिचयातील आहेत. आरोपी राज उर्फ कैलास महेश गणात्रा याचा 25 ऑक्टोबरला वाढदिवस होता. राज यानं त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला पीडित महिलेला निमंत्रित केलं होतं. पार्टी रंगात आली असताना राज, अमोल आणि सिद्धार्थ या तिघांनी एका गाण्यावर चक्क महिलेसमोर अंगावरील कपडे उतवले आणि विवस्त्र अवस्थेत डान्स केला. एवढंच नाही तर पीडित महिलेसोबत अश्लिल वर्तनही गेलं. विवस्त्र डान्स करता तिघे पीडितेला वारंवार स्पर्श करत होतं. नंतर तर आरोपींनी हद्दच केली. त्यांनी पीडित महिलेला शिवीगाळ करून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्नही केला. या प्रकाराचा पीडितेला मोठा धक्का बसला आहे. महिला जवळपास महिनाभर घराबाहेर पडली नाही. तिला आरोपींची भीती वाटत होती. अखेर पीडिता या धक्क्यातून बाहेर निघाल्यानंतर तिनं कोंढवा पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना आपबिती सांगितलं. हेही वाचा… डोक्यात दगड घालून तरुणाची निर्दयी हत्या; सांगलीतील घटना पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीची गांभिर्यानं दखल घेऊन तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपास केला जात असल्याची माहिती कोंढवा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक एस. मोहिते यांनी दिली आहे.