मिरज (सांगली), 06 डिसेंबर : सांगली (sangli) जिल्ह्यातील मिरज (Miraj) या ठिकणी एका 40 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या (Murder Crime) केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना समतानगर येथील रेल्वे कर्मचारी वसाहत परिसरात घडली. गोविंद मुक्तीकोळ (वय- 40) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात दगड घालून आणि गळा चिरून त्याला संपवल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. या हत्येनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत.
सदर प्रकार आज सकाळी उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. गोविंद हा अंमली पदार्थांचा व्यसनी असून समतानगर येथे रेल्वे वसाहतीत वास्तव्यास होता. गोविंदाची आई निवृत्त रेल्वे कर्मचारी आहे.
अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या गोविंदची हत्या समतानगर येथील जुन्या हरिपूर रस्त्यावर झाली असून दोन ते तीन हल्लेखोरांनी ही हत्या केली केली असल्याचा संशय आहे. धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरून आणि डोक्यात दगड घालून निर्दयी हत्या केली आहे. ही हत्या नेमकी कोणी केली अद्याप समजू शकलं नाही.
गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षण प्रविणकुमार कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी गोंविद आणि त्याच्या इतर अंमली पदार्थ व्यसनी मित्रांत वाद होऊन ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. समतानगर परिसरात अशाप्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून गेल्या पंधरवड्यात एका गुन्हेगारी टोळीने समीर शेख नावाच्या तरुणावर धारधार कोयत्याने वार केले होते.