Home /News /maharashtra /

आताशी कुठे झाली होती नवदाम्पत्याच्या आयुष्याची सुरूवात, क्षुल्लक वादानं केला घात

आताशी कुठे झाली होती नवदाम्पत्याच्या आयुष्याची सुरूवात, क्षुल्लक वादानं केला घात

असं म्हणतात की, नवरा-बायकोमध्ये नातं हे काचेच्या भांड्यासारख असतं...

बीड, 2 डिसेंबर: असं म्हणतात की, नवरा-बायकोमध्ये नातं हे काचेच्या भांड्यासारख असतं. हे नातं विश्वासावर टिकत असतं. पण, असं एक साताजन्माचं नातं क्षणात संपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक वादातून पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचं टोकाचं पाऊल उचललं. पत्नीनं विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं समजताच पतीनंही गळफास घेऊन जीवन संपवलं. ही घटना परळी येथील पांगरी कॅम्पमध्ये घडली आहे. प्रियांका पंडित आणि सायस पंडित असं मृत नवदाम्पत्याचं नाव आहे. हेही वाचा...ठाकरे सरकार घेणार आणखी एक महत्त्वाचा निर्णय, जातीवाचक नावं हद्दपार होणार परळी तालुक्यातील पांगरी कॅम्प येथील प्रियांका व सायस यांचा काही महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. घरगुती कारणावरून या दोघांत वाद झाले. त्यातूनच आधी प्रियांकानं आणि त्यानंतर सायस यांनं टोकाचं पाऊल उचलतं जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सायस आणि प्रियांकाचा कुठे संसाराला सुरूवात झाली होती. मात्र, क्षुल्लक वादानं घात केला. प्रियांका हिनं मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास विषारी औषध प्राशन केलं. तिला उपचारासाठी परळीच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचा धक्का सायस सहन करू शकला नाही. त्यानं रात्री अकरा वाजेच्या सुमारास यानं पांगरी कॅम्प येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस करीत आहेत. हेही वाचा...सामान्यांना नको आधी लोकप्रतिनिधींना द्या कोरोना लस, शिवसेना नेत्याची अजब मागणी नवदाम्पत्याच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, अद्याप आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात दोघांची उत्तरीय तपासणी सुरू आहे. यादरम्यान दोन्हीकडील नातेवाईकांनी परळी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Beed, Crime news, Maharashtra, Marathwada, Parli

पुढील बातम्या