देशात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता केंद्र सरकारने लॉकडाऊन 4.0 लागू करण्याचा निर्णय घेतला. आजपासून म्हणजेच 18 मे पासून लॉकडाऊन सुरू झालं आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या आदेशानुसार लॉकडाऊन 4.0 मध्ये काही गोष्टी शिथिल केल्या आहेत. यावेळी काय खुलं असणार आणि काय बंद जाणून घेऊयात...
पुणे, 23 मे : पुण्याचं जुळं शहर पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. एकाच दिवशी 46 एकाच दिवशी रुग्ण आढळले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा कडक करण्यात येणार आहेत. शहरातल्या प्रतिबंधित क्षेत्रात (Containment zoen) वाढ करण्यात येणार आहे. आणखी 15 परिसर आज रात्री 11 नंतर सील केले जाणार आहेत. या भागात शिथिल केलेले लॉकडाऊनचे नियम पुन्हा कडक करण्यात येतील. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाची लागण झालेले 46 रुग्ण एकाच दिवशी दाखल झाले. आज दाखल झालेल्या रुग्णांमध्ये 29 पुरुष आणि 17 स्त्रियांचा समावेश आहे. पुण्याच्या मानाने पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता. या परिसरात दैनंदिन व्यवहार सुरळीत करायला नुकतीच परवानगी दिली होती कंटेन्मेंट झोन वगळता अन्यत्र निर्बंध शिथिल करण्यात आले होते. आता नव्या रुग्णांमुळे या प्रतिबंधित क्षेत्रातच वाढ केली जाणार आहे. वाचा - पुण्यातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीतून कोरोनाबाबत आली नवी माहिती महाराष्ट्रात Coronavirus चं थैमान सुरूच आहे. मुंबई, उपनगरं आणि पुण्यात गेल्या 24 तासांत खूप जास्त कोरोनाग्रस्त आढळले आहेत. दिवसभरात तब्बल 2608 रुग्ण राज्यभरातून वाढले आहेत. गेल्या 24 तासांत 60 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू नोंदला गेला आहे. यातले 40 मुंबईतले तर 14 पुण्यातले रुग्ण आहेत. राज्यभरात कोरोनाबळींच्या संख्येने कालच दीड हजाराचा टप्पा ओलांडला होता. आतापर्यंत 1577 जणांचा या कोरोनाच्या साथीत बळी गेला आहे. ही देशातली सर्वात मोठी संख्या आहे. राज्य सरकारने शनिवारी संध्याकाळी पाठवलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्या 47190 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात 3,48,026 जणांची COVID-19 ची चाचणी करण्यात आली आहे. राज्यभरात घरी विलगीकरणात असलेले (Home Quarantine) 4 लाख 85 हजार 323 जण आहेत तर 33545 लोकांना संस्थात्मक विलगीकरणात (Institutional Quaratine) ठेवण्यात आलं आहे. अन्य बातम्या धक्कादायक! मुंबईतून पुणे जिल्ह्यात आलेले 4 जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह ‘…आणि मला मुख्यमंत्री म्हणून बळ मिळाले’, उद्धव ठाकरेंचं भावनिक पत्र मुंबई-पुण्यात कोरोना कहर कायम; तब्बल 4.85 लाख आहेत होम क्वारंटाइन