पुण्यातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीतून कोरोनाबाबत आली नवी माहिती

पुण्यातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीतून कोरोनाबाबत आली नवी माहिती

दाटीवाटीची वस्ती आणि झोपडपट्टीच्या भागात पसरलेला कोरोनाचा संसर्ग रोखणं आव्हानात्मक ठरत आहे.

  • Share this:

पुणे, 23 मे : राज्याभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याचं चित्र आहे. त्यातही मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये हा व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दाटीवाटीची वस्ती आणि झोपडपट्टीच्या भागात पसरलेला कोरोनाचा संसर्ग रोखणं आव्हानात्मक ठरत आहे. अशा स्थितीत पुण्यातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या जनता वसाहतीतून नवी माहिती समोर आली आहे.

सुरुवातीच्या काळात मोठ्या मेहनतीने कोरोनाला रोखणाऱ्या जनता वसाहतीत आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या वसाहतीत 14 मे रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर मागील 9 दिवसांत या भागातील कोरोनाबाधितांची संख्या 42 वर पोहोचली आहे. एकीकडे, मुंबईत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोनाने आपले पाय घट्ट केल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे. त्यानंतर आता पुण्यातीलही झोपडपट्टीत कोरोनाबाधितांची होत असलेली वाढ चिंतेचा विषय आहे.

दाट लोकवस्तीच्या भागात फिजिकल डिस्टन्सिंग, स्वच्छता अशा उपाययोजना करणं अवघड होतं. त्यामुळे कोरोनासारखा व्हायरस अशा भागातून हद्दपार होणं आव्हानात्मक होवून जातं. त्यामुळे आता पुण्यातील जनता वसाहतीत आगामी काळात आणखी रुग्णांमध्ये वाढ होऊ न देण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.

हेही वाचा - अरेरे…काही लाज? ते चोरत होते कोरोना पीडितांच्या मृतदेहांवरचे दागिनेदरम्यान, पुणे विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 हजार 487 झाली आहे. त 3 हजार 15 ॲक्टीव रुग्ण आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकूण 312 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 195 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 5 हजार 367 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 770 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 334 आहे. कोरोनाबाधित एकूण 263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 187 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात 353, सातारा जिल्ह्यात 40, सोलापूर जिल्ह्यात 24, सांगली जिल्ह्यात 8, कोल्हापूर जिल्ह्यात 33 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2020 07:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading