मुंबई-पुण्यात कोरोना कहर कायम; तब्बल 4.85 लाख आहेत होम क्वारंटाइन

मुंबई-पुण्यात कोरोना कहर कायम; तब्बल 4.85 लाख आहेत होम क्वारंटाइन

महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्या 47190 वर पोहोचली आहे. राज्यात एकूण 4 लाख 85 हजार 323 जण होम क्वारंटाइन आहेत तर 33545 लोकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवलं आहे.

  • Share this:

मुंबई, 23 मे :महाराष्ट्रात Coronavirus चं थैमान सुरूच आहे. मुंबई, उपनगरं आणि पुण्यात गेल्या 24 तासांत खूप जास्त कोरोनाग्रस्त आढळले आहेत. दिवसभरात तब्बल 2608 रुग्ण राज्यभरातून वाढले आहेत. गेल्या 24 तासांत 60 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू नोंदला गेला आहे. यातले 40 मुंबईतले तर 14 पुण्यातले रुग्ण आहेत. राज्यभरात कोरोनाबळींच्या संख्येने कालच दीड हजाराचा टप्पा ओलांडला होता. आतापर्यंत 1577 जणांचा या कोरोनाच्या साथीत बळी गेला आहे. ही देशातली सर्वात मोठी संख्या आहे.

राज्य सरकारने शनिवारी संध्याकाळी पाठवलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्या 47190 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात 3,48,026 जणांची COVID-19 ची चाचणी करण्यात आली आहे. राज्यभरात घरी विलगीकरणात असलेले (Home Quarantine) 4 लाख 85 हजार 323 जण आहेत तर 33545 लोकांना संस्थात्मक विलगीकरणात (Institutional Quaratine) ठेवण्यात आलं आहे.

 वाचा - पुण्यातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीतून कोरोनाबाबत आली नवी माहिती

आज राज्यात नोंद झालेल्या 60 रुग्णांपैकी 40 गेल्या 24 तासांत नोंदले गेले आहेत, तर उर्वरित गेल्या पंधरवड्यातले आहेत.

एकूण कोरोना मृत्यू 60

मुंबई - 40

ठाणे - 1

वसई विरार - 1

पुणे - 14

सोलापूर - 2

सातारा - 1

नांदेड - 1

आज दिवसभरात

नवे रुग्ण 2608

मृत्यू--60( मुंबई 40, पुणे 14)

एकूण मृत्यू--1577

एकूण- 47190

अन्य बातम्या

जूनमध्ये होणार कोरोनाचा उद्रेक; टीबी तपासणीच्या मशीनने होणार कोरोना टेस्ट

कोरोनाला दूर ठेवायचं असेल तर या 5 गोष्टी नियमित करा, तज्ज्ञांनी दिला सल्ला

ट्रेनमुळे 35 लाख कामगार पोहोचले गावी; यातले 80 टक्के UP- बिहारला रवाना

 

First published: May 23, 2020, 8:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading