JOIN US
मराठी बातम्या / देश / 'या' गावात 25 वर्षांमध्ये दाखल झाली नाही एकही पोलीस केस, पाहा काय आहे कारण

'या' गावात 25 वर्षांमध्ये दाखल झाली नाही एकही पोलीस केस, पाहा काय आहे कारण

खरंतर, तितकं टोकाचं काही घडायचंच नाही, असं लोक म्हणतात. मात्र त्यातूनही कोणी तक्रार घेऊन आलंच तर पोलीस त्याबाबत सरपंचांना कळवायचे. सरपंच ते प्रकरण अतिशय समजूतदारपणे सोडवायचे.

जाहिरात

त्यांचं जनतेवरील प्रेम आणि त्यांनी जनतेसाठी केलेलं कार्य याबाबत लोक अभिमानाने सांगतात.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कृष्ण कुमार, प्रतिनिधी नागौर, 27 जुलै : आपण भारतीय फार भाग्यवान आहोत, कारण राज्यघटनेनुसार आपल्याला आपला नेता निवडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपण भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाच्या दृष्टीने सर्व घटनांचा विचार करूनच आपलं मत योग्य व्यक्तीला द्यायला हवं. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील खींवसरच्या नागरिकांनी आपल्या मतदान अधिकाराचा अगदी योग्य उपयोग केला आणि एकाच व्यक्तीला सलग पाचवेळा सरपंचपदी निवडून आणलं. ही गोष्ट जरी अनेक वर्षांपूर्वीची असली तरी माजी सरपंच दिवंगत प्रेमसिंह भाटी हे आजही खींवसरकरांच्या हृदयात आहेत. प्रेमसिंह भाटी यांचं जनतेवरील प्रेम आणि त्यांनी जनतेसाठी केलेलं कार्य याबाबत खींवसरकर अभिमानाने सांगतात. इतकंच नाही, तर त्यांनी खींवसरच्या मुख्य बाजारपेठेत प्रेमसिंह यांची मूर्तीदेखील उभारली आहे.

स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, प्रेमसिंह भाटी हे त्यांच्या न्याय मिळवून देण्याच्या शैलीसाठी खास ओळखले जायचे. ते कधीच जाती-धर्माच्या आधारावर न्यायनिवाडा करायचे नाहीत. दोन गटांमध्ये भांडण झाल्यास ते दोन्ही गटांना समोर बसवून अत्यंत शांततेत त्यांच्याशी चर्चा करायचे. ज्या गटाची किंवा व्यक्तीची खरोखर चूक असेल, त्यांनाच शिक्षा द्यायचे. जसा गुन्हा, तशी शिक्षा दिली जात असे. एक भारतात आली, दुसरी पाकिस्तानात गेली! या 2 प्रेमवेड्या नेमक्या आहेत तरी कोण? विशेष म्हणजे प्रेमसिंह भाटी यांच्या कार्यकाळात खींवसरमधून एकही प्रकरण पोलिसात दाखल झालं नाही. खरंतर, तितकं टोकाचं काही घडायचंच नाही, असं लोक म्हणतात. मात्र त्यातूनही कोणी तक्रार घेऊन आलंच तर पोलीस त्याबाबत प्रेमसिंह यांना कळवायचे. प्रेमसिंह ते प्रकरण अतिशय समजूतदारपणे सोडवायचे. प्रेमसिंह भाटी यांचा जन्म 23 ऑगस्ट 1933 रोजी झाला होता. त्यांनी आपलं आयुष्य लोकसेवेत वेचलं. 1965 साली ते सरपंच पदासाठी पहिल्यांदा निवडणूक लढले होते. त्यावेळी त्यांचा विजय झालाच, मात्र जनतेने सलग पाच वर्ष त्यांना निवडून आणलं. ते एक व्यक्ती म्हणून इतके चांगले होते की, दर निवडणुकीत विरोधक उमेदवाराचं गळ्यात फुलांची माळ घालून स्वागत करायचे. 1965 ते 1990 या काळात ते राजकारणात सक्रीय होते. 24 जून 1991 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने अख्खा खींवसर विभाग हळहळला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या